Raju Srivastava: ‘पहिल्यांदाच रडवलंस भावा’; कपिल शर्माची भावूक पोस्ट
राजू श्रीवास्तव यांच्याबाबतची कपिल शर्माची 'ती' इच्छा अपूर्णच!
प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांच्या निधनाने संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. राजू यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या जाण्याने कुटुंबीयांसोबतच चाहते आणि बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा शोकाकुल झाले आहेत. राजू यांच्याप्रमाणेच कपिल शर्मालाही (Kapil Sharma) कॉमेडीचा बादशाह मानला जातं. राजू यांच्या निधनानंतर कपिल शर्मानेही सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली आहे. जुन्या आठवणींना उजाळा देत कपिलने एक फोटोसुद्धा शेअर केला आहे. या फोटोमध्ये कपिल आणि राजू हसताना दिसत आहेत.
‘आज पहिल्यांदाच तू मला रडवलंस, राजू भाई. आपली अजून एक भेट व्हायला पाहिजे होती. देव तुला त्याच्या चरणी स्थान देवो. तुझी खूप आठवण येईल. अलविदा, ओम शांती,’ अशा शब्दांत कपिलने भावना व्यक्त केल्या आहेत.
View this post on Instagram
कपिलप्रमाणेच अभिनेत्री शिल्पा शेट्टी, हिंमाशी खुराना, आमिर खान, रवी किशन, अली असगर, विवेक अग्निहोत्री यांसारख्या कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित दु:ख व्यक्त केलं.
ॐ शांति?? My heart goes out to his family and millions of his fans who loved him so dearly?
Thank you for making us laugh for decades, Raju ji!♥️ You went too soon… #RajuSrivastava pic.twitter.com/9I3ukIGWvx
— SHILPA SHETTY KUNDRA (@TheShilpaShetty) September 21, 2022
राजू यांना 10 ऑगस्ट रोजी जिममध्ये व्यायाम करताना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात त्यांनी जवळपास 40 दिवस मृत्यूशी झुंज दिली.
You will live on forever in our memories, #RajuSrivastava Ji. Thank you for spreading so much joy and laughter in this world. May you rest in peace and may God give strength to your loved ones.? pic.twitter.com/rfO7L9npj1
— Aamir Khan Productions (@AKPPL_Official) September 21, 2022
रुग्णालयात दाखल केल्यापासून राजू यांना शुद्धच आली नव्हती. ते सतत व्हेंटिलेटरवर होते. फक्त एक-दोनदा त्यांच्या शरीराची हलकी हालचाल झाली. मधल्या काळात त्यांच्या तब्येतीत थोडीफार सुधारणा झाली होती. पण गेल्या पाच दिवसांपासून त्यांना खूप ताप आणि शरीरात संसर्गही झाला होता. संसर्गामुळे कुटुंबातील एकाही सदस्याला त्यांची भेट घेण्याची परवानगी नव्हती.