‘ब्रह्मास्त्र’च्या कलेक्शनचे आकडे Fake? करण जोहरने दिली पहिली प्रतिक्रिया

Brahmastra चित्रपटाच्या कलेक्शनवरून मतमतांतरे; नेमकं काय सत्य?

'ब्रह्मास्त्र'च्या कलेक्शनचे आकडे Fake? करण जोहरने दिली पहिली प्रतिक्रिया
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 29, 2022 | 5:21 PM

अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र: पार्ट वन शिवा’ (Brahamstra) या चित्रपटाला प्रदर्शित होऊन तीन आठवडे पूर्ण झाले. या चित्रपटाने भारतात 260 कोटी रुपयांची कमाई केली. तर जगभरात 410 कोटी रुपयांचा गल्ला (Box Office Collection) जमवला. मात्र ब्रह्मास्त्रच्या कलेक्शनच्या आकड्यांवरून सुरुवातीपासूनच मतमतांतरे पहायला मिळत आहेत. हे आकडे बनावट आहेत, असाही आरोप केला जात आहे. आता निर्माता करण जोहरने (Karan Johar) या सर्व चर्चांवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात करण जोहर आणि दिग्दर्शक अयान मुखर्जीने हजेरी लावली होती. या कार्यक्रमात करणला ब्रह्मास्त्रच्या कमाईच्या आकड्यांवरून प्रश्न विचारण्यात आला. यावेळी करण म्हणाला, “आजच्या डिजिटल विश्वात आकड्यांची हेराफेरी करणं कठीणच नाही तर अशक्य आहे. सध्याच्या काळात प्रत्येक डाटा ट्रॅक केला जातो. जर कोणाला या आकड्यांना चुकीचं सिद्ध करायचं असेल तर त्याने डिजिटल पद्धतीने ट्रॅक करून त्यांचं गणित करू शकतो.”

हे सुद्धा वाचा

ब्रह्मास्त्रचा दिग्दर्शक अयान यावेळी म्हणाला, “हा संपूर्ण प्रवास अत्यंत आव्हानात्मक होता. प्रत्येक दिवशी आम्ही नव्या समस्येचा सामना केला आणि आता दुसरा, तिसरा भाग बनवणंही सोपं नाही.”

अयानचं कौतुक करताना करण पुढे म्हणाला, “ये जवानी है दिवानी या चित्रपटानंतर अयान दुसरा कमर्शिअल चित्रपट बनवू शकला असता. खूप पैसा कमवू शकला असता. पण त्याने असं केलं नाही. आर्थिकदृष्टया पाहिलं तर सात वर्षांपूर्वी तो जिथे होता, आतासुद्धा तिथेच आहे. मात्र त्याची महत्त्वाकांक्षा आणि जिद्द खूप मोठी आहे.”

ब्रह्मास्त्रच्या नकारात्मक रिव्ह्यूबद्दल अयानला प्रश्न विचारला असता त्याने सांगितलं, “कोणत्याही चित्रपटाला मिळालेल्या रिव्ह्यूचं स्वत:चं एक महत्त्व असतंच. पण अखेरीस बॉक्स ऑफिसचे आकडेत सर्वकाही सांगतात. सध्या चित्रपट अजूनही थिएटरमध्ये आहे. त्यामुळे त्यासंदर्भात येणाऱ्या प्रतिक्रिया आणि टिप्पण्यांवर विश्लेषण करण्यासाठी मला थोडा वेळ लागेल.”

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.