Bhool Bhulaiyaa 2: बॉक्स ऑफिसवर ‘भुल भुलैय्या 2’ ठरतोय हिट; जाणून घ्या पहिल्या 2 दिवसांची कमाई

पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 14.11 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. कार्तिक आर्यनच्या (Kartik Aaryan) करिअरमधील हा पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. तर दुसऱ्या दिवशी या कमाईतही चांगली वाढ पहायला मिळाली.

Bhool Bhulaiyaa 2: बॉक्स ऑफिसवर 'भुल भुलैय्या 2' ठरतोय हिट; जाणून घ्या पहिल्या 2 दिवसांची कमाई
Bhool Bhulaiyaa 2Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 22, 2022 | 12:06 PM

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’नंतर आता कार्तिक आर्यनच्या ‘भुल भुलैय्या 2’ (Bhool Bhulaiyaa 2) या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवशी दणक्यात कमाई केली आहे. बॉलिवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत नसल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. आता ‘भुल भुलैय्या 2’ या चित्रपटाने चर्चेला पूर्णविराम दिला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 14.11 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. कार्तिक आर्यनच्या (Kartik Aaryan) करिअरमधील हा पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. तर दुसऱ्या दिवशी या कमाईतही चांगली वाढ पहायला मिळाली. शनिवारी ‘भुल भुलैय्या 2’ने 18.34 कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या दोन दिवसांत या चित्रपटाने 30 कोटींचा आकडा पार केला आहे. कंगना रनौतचा ‘धाकड’ (Dhaakad) हा चित्रपटसुद्धा शुक्रवारी प्रदर्शित झाला. कंगनानेही सोशल मीडियावर पोस्ट लिहित ‘भुल भुलैय्या 2’चं कौतुक केलं आहे.

भुलभुलैय्या 2 ची कमाई-

पहिला दिवस- 14.11 कोटी रुपये दुसरा दिवस- 18.34 कोटी रुपये एकूण- 32.45 कोटी रुपये

हे सुद्धा वाचा

वीकेंडची कमाई 50 कोटींहून अधिक होण्याची शक्यता

अनीस बाझमी दिग्दर्शित ‘भुल भुलैय्या 2’मध्ये कार्तिक आर्यनसह कियारा अडवाणी आणि तब्बूचीही भूमिका आहे. 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भुल भुलैय्या’चा हा सीक्वेल आहे. पहिल्या भागात अक्षय कुमार आणि विद्या बालनने मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या सीक्वेलमध्ये मंजुलिका हे पात्र आणि तिचं ‘आमी जे तोमार’ हे गाणं सोडल्यास पहिल्या भागाशी काहीही साम्य नाही.

गेल्या काही दिवसांत प्रदर्शित झालेल्या बॉलिवूड चित्रपटांना फारसं यश मिळालं नाही. रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेल्या ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त तीन कोटी रुपये कमावले होते. अजय देवगणचा ‘रनवे 34’, जॉन अब्राहमचा ‘अटॅक’, शाहिद कपूरचा ‘जर्सी’ आणि टायगर श्रॉफचा ‘हिरोपंती 2’ या चित्रपटांनाही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करता आली नाही.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.