KGF 2: थांबायचं न्हाय आता थांबायचं न्हाय! 11 दिवसांत ‘केजीएफ 2’च्या कमाईचा थक्क करणारा आकडा
कन्नड सुपरस्टार यशची (Yash) मुख्य भूमिका असलेला 'केजीएफ: चाप्टर 2' (KGF Chapter 2) हा चित्रपट प्रदर्शनाच्या अकराव्या दिवशी म्हणजेच आज (रविवार) कमाईचा 300 कोटींचा टप्पा पार करणार आहे. गेल्या दहा दिवसांत या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने 298.44 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
कन्नड सुपरस्टार यशची (Yash) मुख्य भूमिका असलेला ‘केजीएफ: चाप्टर 2’ (KGF Chapter 2) हा चित्रपट प्रदर्शनाच्या अकराव्या दिवशी म्हणजेच आज (रविवार) कमाईचा 300 कोटींचा टप्पा पार करणार आहे. गेल्या दहा दिवसांत या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने 298.44 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. मूळ कन्नड भाषेत असलेला हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्येही प्रदर्शित झाला आहे. 2019 मध्ये हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्या ‘वॉर’ (War) या चित्रपटाने 300 कोटींचा टप्पा पार केला होता. त्यानंतर आता केजीएफ 2 ने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. प्रशांत नील दिग्दर्शित हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘केजीएफ: चाप्टर 1’चा सीक्वेल आहे. पहिल्या चित्रपटानंतर या सीक्वेलची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती.
300 कोटी रुपयांची कमाई करणारे चित्रपट
2014- पीके 2015- बजरंगी भाईजान 2016- सुलतान 2016- दंगल 2017- टायगर जिंदा है 2018- पद्मावत 2018- संजू 2019- वॉर 2022- केजीएफ: चाप्टर 2
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शचे ट्विट-
#KGF2 #Hindi benchmarks… Crossed ₹ 50 cr: Day 1 ₹ 100 cr: Day 2 ₹ 150 cr: Day 4 ₹ 200 cr: Day 5 ₹ 225 cr: Day 6 ₹ 250 cr: Day 7 ₹ 275 cr: Day 9 ₹ 300 cr: Day 11#India biz ⭐ Will #KGF2 challenge *lifetime biz* of #Dangal, the second highest grosser? What’s *your* take? pic.twitter.com/4fkiRC29nl
— taran adarsh (@taran_adarsh) April 24, 2022
₹ 300 CR CLUB & ITS MEMBERS… ⭐ 2014: #PK ⭐ 2015: #BajrangiBhaijaan ⭐ 2016: #Sultan ⭐ 2016: #Dangal ⭐ 2017: #TigerZindaHai ⭐ 2018: #Padmaavat ⭐ 2018: #Sanju ⭐ 2019: #War ⭐ 2022: #KGF2 ??? #Baahubali2 [2017] is the *ONLY* film in ₹ 500 cr Club.#India biz. #Hindi pic.twitter.com/B7NpXPcE8q
— taran adarsh (@taran_adarsh) April 24, 2022
#KGF2 continues to rule hearts and #BO… ⭐ Will score TRIPLE CENTURY today [second Sun; Day 11] ⭐ First film to hit ₹ 300 cr since #War [2019] ⭐ 10th film to swim past ₹ 300 cr mark [Week 2] Fri 11.56 cr, Sat 18.25 cr. Total: ₹ 298.44 cr. #India biz. #Hindi pic.twitter.com/3G5Te3Te2D
— taran adarsh (@taran_adarsh) April 24, 2022
हिंदी बॉक्स ऑफिसवर 500 कोटींची कमाई करणारा 2017 मध्ये प्रदर्शित झालेला ‘बाहुबली 2’ हा एकमेव चित्रपट असल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने दिली. बॉक्स ऑफिसवर मिळणारा हा प्रतिसाद पाहून चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता यश (Yash) हा भारावून गेला आहे. त्याने सोशल मीडियावर चाहत्यांसाठी खास व्हिडीओ पोस्ट करत त्यांचे आभार मानले. “धन्यवाद हा शब्दही आभार मानण्यासाठी पुरेसा नाही”, असं तो म्हणालाय. या चित्रपटात यशने रॉकीची भूमिका साकारली असून संजय दत्त, रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी आणि प्रकाश राज यांच्याही भूमिका आहेत. यशचं खरं नाव नवीन कुमार गोवडा असं असून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील तो लोकप्रिय अभिनेता आहे.
‘केजीएफ: चाप्टर 2’चे बेंचमार्क्स-
पहिला दिवस- 50 कोटींचा टप्पा पार केला दुसरा दिवस- 100 कोटी रुपये चौथा दिवस- 150 कोटी रुपये पाचवा दिवस- 200 कोटी रुपये सहावा दिवस- 225 कोटी रुपये सातवा दिवस- 250 कोटी रुपये नऊवा दिवस- 275 कोटी रुपये अकरावा दिवस- 300 कोटी रुपये
हेही वाचा:
Dharmaveer: ‘धर्मवीर’ चित्रपटात एकनाथ शिंदेंची भूमिका साकारणार ‘हा’ अभिनेता; पहा खास लूक