Makarand Deshpande: “तुम्ही जे म्हणाल ती हेडलाइन बनू शकत असेल तर..”; मकरंद देशपांडेंचा सेलिब्रिटींना सल्ला

मकरंद देशपांडे (Makarand Deshpande) हे लवकरच 'शूरवीर' (Shoorveer) या वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या सीरिजमध्ये ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराची भूमिका साकारणार आहेत.

Makarand Deshpande: तुम्ही जे म्हणाल ती हेडलाइन बनू शकत असेल तर..; मकरंद देशपांडेंचा सेलिब्रिटींना सल्ला
Makarand DeshpandeImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 9:56 AM

अभिनेते मकरंद देशपांडे (Makarand Deshpande) हे लवकरच ‘शूरवीर’ (Shoorveer) या वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या सीरिजमध्ये ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराची भूमिका साकारणार आहेत. यानिमित्त नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते अभिनय आणि कलाकारांविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. अशा देशभक्तीपर चित्रपट किंवा सीरिजचा त्यांच्या खऱ्या आयुष्यावर काय प्रभाव पडतो याबद्दलही ते बोलले. यासोबतच जातीय तेढ (communal tension) निर्माण होणाऱ्या वातावरणात एखाद्या सेलिब्रिटीने किंवा सामान्य व्यक्तीने कोणती जबाबदारी पेलली पाहिजे, याबद्दलही त्यांनी सांगितलं.

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “आपण विवेकबुद्धीने वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण कुठल्या तरी एका बाजूने नाही तर कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाजूने आहोत, हे लक्षात घेतलं पाहिजे. देश जो काही निर्णय घेईल, त्या निर्णयाच्या पाठीशी आपण उभं राहायला हवं. अशा काळात काहीही प्रक्षोभक केलं नाही तर समस्या आपोआप मिटते. आपण जे बोलतो ते हेडलाईन बनू शकतं अशी ताकद जर आपल्यात असेल तर असं विधान आपण करू नये. हेडलाईन हे नेहमीच चांगल्या कारणासाठी नसतात, अनेकदा ते विध्वंसकही असतात. कायदा आणि सुव्यवस्था काय करू शकतं यावर आपण विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करूयात. आपण शांततेसाठी काम केलं पाहिजे. हम सब एक है, एक ही रहेंगे. हम हिंदुस्तानी हैं, हिंदुस्तानी रहेंगे”, असं ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

‘शूरवीर’ या वेब सीरिजविषयी बोलताना त्यांनी पुढे सांगितलं, “ट्रेलरमध्ये तिन्ही दल एकत्र येत असल्याचं दाखवण्यात आलं आहे, जे खूप खास आहे. कारवाई करण्यात ते वेळ वाया घालवत नाहीत आणि ते कोणत्याही मर्यादेपर्यंत जाऊ शकतात. कथा आणि देशभक्ती व्यतिरिक्त लोकांना यातील सिनेमॅटोग्राफी पाहणंदेखील आवडेल. मी त्याला मॅग्नम ओपस म्हणतो. यात लढाऊ विमानं आहेत. जेव्हा तुम्ही RRR सारखा चित्रपट पाहता तेव्हा तुम्ही ते त्याच्या स्केलसाठी पाहता. या सीरिजच्या बाबतीतही हीच गोष्ट आहे.”

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....