प्रदर्शनापूर्वीच ऐश्वर्याच्या ‘पोन्नियिन सेल्वन’चा धमाका; तब्बल इतक्या कोटींना विकले OTT राइट्स

यामध्ये ऐश्वर्या राय बच्चन, चियान विक्रम, कार्ती, जयम रवी, त्रिशा, ऐश्वर्या लक्ष्मी आणि शोभिता धुलिपाला यांसारख्या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात ऐश्वर्या दुहेरी भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे.

प्रदर्शनापूर्वीच ऐश्वर्याच्या 'पोन्नियिन सेल्वन'चा धमाका; तब्बल इतक्या कोटींना विकले OTT राइट्स
Aishwarya Rai BachchanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 12, 2022 | 6:09 PM

प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम (Mani Ratnam) यांचा बिग बजेट चित्रपट ‘पोन्नियिन सेल्वन’ (Ponniyin Selvan: I) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी हा चित्रपट पूर्णपणे सज्ज झाला आहे. येत्या 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. दिग्दर्शक मणिरत्नम यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. जवळपास 500 कोटींच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनवण्यात आला आहे. पोन्नियिन सेल्वनच्या डिजिटल स्ट्रीमिंगचे अधिकार ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ (Amazon Prime) या ओटीटी प्लॅटफॉर्मला मोठ्या किंमतीत विकले गेले आहेत. त्यामुळे प्रदर्शनाच्या आधीच निर्मात्यांचा मोठा नफा झाला आहे.

कल्की कृष्णमूर्ती यांच्या प्रसिद्ध कादंबरीवर पोन्नियिन सेल्वन भाग 1 हा चित्रपट आधारित आहे. या पुस्तकात राजा चोझानची कथा अधोरेखित करण्यात आली आहे. नुकताच चेन्नईच्या नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. चाहते या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पोन्नियिन सेल्वनच्या दोन्ही भागांचे डिजिटल स्ट्रीमिंग अधिकार जवळपास 125 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. या चित्रपटासाठी हा करार खूप मोठा मानला जात आहे.

हे सुद्धा वाचा

ऐश्वर्या दुहेरी भूमिकेत दिसणार?

मणिरत्नम यांचा हा चित्रपट तमिळ इंडस्ट्रीसाठी एक गेम चेंजर ठरणार असल्याचं मानलं जात आहे. हा चित्रपट दोन भागात बनवण्यात आला आहे. यामध्ये ऐश्वर्या राय बच्चन, चियान विक्रम, कार्ती, जयम रवी, त्रिशा, ऐश्वर्या लक्ष्मी आणि शोभिता धुलिपाला यांसारख्या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात ऐश्वर्या दुहेरी भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ऐश्वर्या आणि दिग्दर्शक मणिरत्नम हे चौथ्यांदा एकत्र काम करत आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.