Mangesh Desai: मंगेश देसाई यांच्या गाडीचा अपघात; फोटो आले समोर
मंगेश हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत कर्जतला जात असताना हा अपघात झाला. वाशीतल्या (Vashi) कोकण भवनजवळ त्यांच्या गाडीचा हा अपघात झाला असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु मंगेश यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं.
अभिनेता आणि निर्माता मंगेश देसाई (Mangesh Desai) यांच्या गाडीचा अपघात (Car Accident) झाल्याची माहिती समोर येत आहे. मंगेश हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत कर्जतला जात असताना हा अपघात झाला. वाशीतल्या (Vashi) कोकण भवनजवळ त्यांच्या गाडीचा हा अपघात झाला असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु मंगेश यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं. अचानक ब्रेक लागल्यामुळे हा अपघात झाल्याचं कळतंय. यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. या अपघाताचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये मंगेश देसाई यांच्या गाडीचं नुकसान झाल्याचं दिसतंय.