Aapla Bioscope 2023 : कोण ठरणार ‘आपला बायोस्कोप २०२३’ पुरस्कारांचे मानकरी?

महाराष्ट्रातील नंबर १ मराठी न्यूज चॅनेल TV9 मराठीच्या वतीने 'आपला बायोस्कोप २०२३' पुरस्कार सोहळ्याची घोषणा, मालिका, चित्रपट विभागात जोरदार चुरस...परीक्षक आणि प्रेक्षक पसंतीचा कौल ध्यानात घेत विजेते ठरणार

Aapla Bioscope 2023 : कोण ठरणार 'आपला बायोस्कोप २०२३' पुरस्कारांचे मानकरी?
aapla bioscopeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 08, 2023 | 7:47 PM

मुंबई | 07 नोव्हेंबर 2023 : महाराष्ट्रातील नंबर १ मराठी न्यूज चॅनेल TV9 मराठीच्या वतीने ‘आपला बायोस्कोप २०२३’ या पुरस्कार सोहळ्याची घोषणा झाली. घोषणा झाल्यापासून पुरस्कारांसाठी मराठी ससनेसृष्टीत उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘आपला बायोस्कोप २०२३’ या पुरस्कारासाठी नामांकने जाहीर झाली असून सगळ्या विभागाच कमालीची चरुस आहे. परीक्षक आणि प्रेक्षक पसंतीचा कौल ध्यानात घेत विजेते ठरणार आहेत. तुमच्या आवडत्या कलाकाराला कुठल्या कॅटगरीत नॉमिनेशन मिळालं आहे? तसेच चित्रपटात कोण बाजी मारणार? याची उत्सुकता तुम्हालाही लागून राहिली असेलच. लवकरच आपली प्रतीक्षा संपणार आहे. TV9 मराठी आयोजित ‘आपला बायोस्कोप २०२३’ हा दिमाखदार सोहळा 30 नोव्हेंबरला संपन्न होणार आहे.

‘वाळवी’, ‘बापल्योक’, ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘गोदावरी’, ‘सुभेदार’, ‘बालभारती’, ‘गोष्ट एका पैठणीची’ या गाजलेल्या चित्रपटांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. तर मालिका विभागात ‘रमा राघव’, ‘भाग्य दिले तू मला’, ‘प्रेमाची गोष्ट’, ‘ठरलं तर मग’, ‘तुझेच मी गीत गात आहे’, ‘छोट्या बायोची मोठी स्वप्न’, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’, या मालिका स्पर्धेत आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शिकाचा बहुमान पटकावण्यासाठी ही जोरदार स्पर्धा रंगणार आहे.

मालिकेसाठी सर्वोत्कृष्ट मुख्य अभिनेता, सर्वोत्कृष्ट मुख्य अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट खलनायक, सर्वोत्कृष्ट खलनायिका, सर्वोत्कृष्ट जोडी, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट नॉन – फिक्शन या श्रेणीमध्ये तर, चित्रपट विभागासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट खलनायक, सर्वोत्कृष्ट खलनायिका, सर्वोत्कृष्ट जोडी, वर्षातील सर्वोत्कृष्ट गाणे, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या श्रेणीमध्ये स्पर्धा रंगणार आहे.

‘टीव्ही 9 मराठी’च्या वतीने आयोजित “आपला बायोस्कोप – टीव्ही आणि चित्रपट पुरस्कार 2023” या पुरस्कारांसाठी सर्वोत्कृष्ट कलाकार आणि कलाकृतींची अंतिम यादी निश्चित करण्यात आली आहे. लोकप्रिय विभागातील सदर यागी रसिक प्रेक्षकांसाठी खुली करण्यात आली आहे. आता प्रेक्षकांनीच आपल्या आवडत्या कलाकृतीवर आपल्या मताच्या माध्यमातून पसंतीची मोहोर उमटून तिला विजयी करुन द्यावे.

मराठी मनोरंजन जगताने यंदा एकाहून एक सरस कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीस आणल्या. त्यामुळे अंतिम यादी निश्चित करताना जाणकार परिक्षकांना मोठी कसरत करावी लागली. अशीच काहीशी अवस्था यादी पाहिल्यावर प्रेक्षकांची झाल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही…

आपलं मत देण्यासाठी www.tv9marathi.com/aaplabioscope वर लॉग ऑन करा..

पुरस्कारासाठी निवड झालेली यादी खालीलप्रमाणे

मालिका विभाग

सर्वोत्कृष्ट मराठी मालिका

रमा राघव, भाग्य दिले तू मला, प्रेमाची गोष्ट, ठरलं तर मग, तुझेच मी गीत गात आहे, छोट्या बयोची मोठी स्वप्नं, तुला शिकवीन चांगलाच धडा

सर्वोत्कृष्ट अभिनेता

अक्षय मुदवाडकर (जय जय स्वामी समर्थ), विवेक सांगळे (भाग्य दिले तू मला), अतुल आगलावे (सिंधुताई माझी माई), अमित भानुशाली (ठरलंतर मग), अभिजीत खांडकेकर (तुझेच मी गीत गात आहे), विक्रम गायकवाड (छोट्या बयोची मोठी गोष्ट), ऋषिकेश शेलार (तुला शिकवीन चांगलाच धडा)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

तन्वी मुंडले (भाग्य दिले तू मला), जुई गडकरी (ठरलं तर मग), अवनी तायवाडे (तुझचे मी गीत गात आहे), शिवानी रांगोळे (तुला शिकवीन चांगलाच धडा)

सर्वोत्कृष्ट जोडी

विवेक सांगळे आणि तन्वी मुंडले (भाग्य दिले तू मला), अतुल आगलावे आणि शिवानी सोनार (सिंधूताई माझी माई), मंदार जाधव आणि गिरीजा प्रभू (सुख म्हणजे नक्की काय असतं), हर्षद अतकरी आणि समृद्धी केळकर (फुलला सुगंध मातीचा), सिद्धार्थ खिरिद आणि संचिता कुलकर्णी (राणी मी होणार), ऋषिकेश शेलार आणि शिवानी रांगोळे (तुला शिकवीन चांगलाच धडा), ऐश्वर्या शेटे आणि निखिल दामले (रमा राघव)

सर्वोत्कृष्ट खलनायक

सुदेश म्हशीलकर (भाग्य दिले तू मला), सुनिल तावडे (पिंकीचा विजय असो), श्रेयस राजे (फुलला सुगंध मातीचा), आशुतोष गोखले (रंग माझा वेगळा), सुयश टिळक (अबोली), शंतनू मोघे(छोट्या बयोची मोठी स्वप्नं)

सर्वोत्कृष्ट खलनायिका

जान्हवी किल्लेकर (भाग्य दिले तू मला), माधवी निमकर (सुख म्हणजे नक्की काय असतं), आशा शेलार (पिंकीचा सवजय असो), दिपाली जाधव (तुजं माजं सपान प्रेमाचं तुफान), कविता लाड – मेढेकर (तुला सशकवीन चांगलाच धडा), अपूर्वा नेमळेकर (प्रेमाची गोष्ट)

सर्वोत्कृष्ट नॉन फिक्शन

ढोलकीच्या तालावर, आता होऊ दे धिंगाना- सीझन १, मी होणार सुपरस्टार.. जल्लोष ज्युनियर्सचा, चला हवा येऊ द्या, महाराष्ट्राची हास्यजत्रा

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता

कांचन पगारे (रमा राघव), प्रशांत चौडप्पा (फुलला सुगंध मातीचा), शशांक दरणे (छोट्या बयोची मोठी स्वप्नं), जयंत घाटे (सातव्या मुलीची सातवी मुलगी)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री

सुहिता थत्ते (रमा राघव), निवेदिता सराफ (भाग्य दिले तू मला), योगिनी चौक (सिंधूताई माझी माई), वर्षा उसगांवकर (सुख म्हणजे नक्की काय असतं), ज्योती चांदेकर (ठरलं तर मग), ऋचा गायकवाड (छोट्या बयोची मोठी स्वप्नं)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन

केदार वैद्य (रमा राघव), सागर खेऊर (भाग्य दिले तू मला), चंद्रकांत कणसे (सुख म्हणजे नक्की काय असतं), सचिन गोखले (ठरलं तर मग), विघ्नेश कांबळे (तुझेच मी गीत गात आहे), चंद्रकांत गायकवाड (तुला सशकवीन चांगलाच धडा)

चित्रपट विभाग

सर्वोत्कृष्ट अभिनेता

स्वप्निल जोशी (वाळवी), शशांक शेंडे (बापल्योक), अंकुश चौधरी (महाराष्ट्र शाहीर), रितेश देशमुख (वेड), जितेंद्र जोशी (गोदावरी)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

शिवानी सुर्वे (वाळवी), सना केदार शिंदे (महाराष्ट्र शाहीर), नंदिता पाटकर (बालभारती), सायली संजीव (गोष्ट एका पठैणीची)

सर्वोत्कृष्ट जोडी

स्वप्निल जोशी आणि शिवानी सुर्वे (वाळवी), अंकुश चौधरी आणि सना केदार शिंदे (महाराष्ट्र शाहीर), रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख (वेड), सुव्रत जोशी आणि सायली संजीव (गोष्ट एका पैठणीची)

सर्वोत्कृष्ट खलनायक

सयाजी शिंदे (घर बंदकू बिर्याणी), रविराज कांदे (वेड), यशराज डिंबळे (रौंदळ), दिग्विजय रोहिदास (सुभदेार), यशपाल सरनाटे (सरला एक कोटी)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता

सिद्धार्थ जाधव (बालभारती), सुबोध भावे (वाळवी), अतुल काळे (महाराष्ट्र शाहीर), प्रियदर्शन जाधव (गोदावरी), चिन्मय मांडलेकर (सुभेदार), आर्यन मेंघजी (बालभारती)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री

अनिता दाते (वाळवी), जिया शंकर (वेड), मृणाल कुलकर्णी (सुभदेार), गिरीजा ओक (गोष्ट एका पैठणीची), छाया कदम (सरला एक कोटी), सुकन्या मोने (बाईपण भारी देवा)

सर्वोत्कृष्ट गीत

बहरला हा मधुमास… (महाराष्ट्र शाहीर), वेड तुझं (वेड), मंगळागौर (बाईपण भारी देवा), ढगानं आभाळ (रौंदळ), बहर आला (गोष्ट एका पैठणीची), केवड्याचं पान(सरलाएक कोटी)

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

वाळवी, बापल्योक, महाराष्ट्र शाहीर, गोदावरी, सुभेदार, बालभारती, गोष्ट एका पैठणीची

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक

परेश मोकाशी (वाळवी), केदार शिंदे (महाराष्ट्र शाहीर), निखिल महाजन (गोदावरी), दिग्पाल लांजेकर (सुभदेार), नितीन नंदन (बालभारती)

पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.