‘विठ्ठल विठ्ठला’ चित्रपटात अमोल कोल्हे साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका
राजा शिवछत्रपती, स्वराज्यरक्षक संभाजी, स्वराज्यजननी जिजामाता अशा अनेक ऐतिहासिक मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) आता एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
राजा शिवछत्रपती, स्वराज्यरक्षक संभाजी, स्वराज्यजननी जिजामाता अशा अनेक ऐतिहासिक मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) आता एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘विठ्ठल विठ्ठला’ (Vitthal Vitthala) या आगामी चित्रपटात ते महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. बॉलिवुड चित्रपट ‘चॉक अँड डस्टर’, ‘नटसम्राट’ या चित्रपटाचा गुजराती रिमेक, ‘गुजरात 11’ तसंच सुपरहिट चित्रपट ‘हल्की फुलकी’चे दिग्दर्शक जयंत गिलाटर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. रणभूमी या चित्रपटानंतर पुन्हा एकदा डॉ. अमोल कोल्हे आणि जयंत गिलाटर एकत्र काम करत आहेत. (Marathi Movie)
जयंत गिलाटर यांच्या मते ‘विठ्ठल विठ्ठला’ हा आजच्या पिढीतील तरूणाईचा विषय आहे. आजची तरुण पिढी पाश्चात्य संस्कृतीला बळी पडून आपली भारतीय संस्कृती आणि मूल्ये विसरत चालली आहे. आजच्या तरुणांना प्रेरणा देणारा सामाजिक संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे. ‘विठ्ठल विठ्ठला’ची निर्मिती संगिता अहिर, बालागिरी वेठगिरी आणि जयंत गिलाटर करणार आहेत. चित्रपटाला डब्बू मलिक संगीत देणार आहे.
आजपर्यंत अमोल कोल्हेंनी अनेक ऐतिहासिक मालिकांमध्ये काम केलंय. त्यांनी साकारलेल्या भूमिकांनी लोकांच्या मनावर राज्य केलं. आता ‘विठ्ठल विठ्ठला’ या चित्रपटात ते कोणत्या भूमिकेत दिसतील, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. त्याचबरोबर चित्रपटात इतर कोणते कलाकार झळकतील याविषयीची माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र तरुणाईला प्रेरणा देणाऱ्या या चित्रपटातून अमोल कोल्हे पुन्हा एकदा आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडतील, असा विश्वास चाहत्यांकडून व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा:
KGF Chapter 2: अवघ्या तीन दिवसांत 150 कोटींकडे वाटचाल; वीकेंड कमाईचाही विक्रम मोडणार
Aai Kuthe Kay Karte: ‘आई कुठे काय करते’च्या सेटवरील एक दिवस; ‘अनिरुद्ध’ला का आवडतं काल्पनिक विश्व?