OBC Reservation: ‘क्रेडिड घ्यायचा केविलवाणा प्रयत्न सुरू’, ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आरोह वेलणकरचं ट्विट चर्चेत

बांठिया आयोगाच्या अहवालातील शिफारशीनुसार राज्यातील निवडणुका घ्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिला आहे. दोन आठवड्यात उर्वरित निवडणुका जाहीर करा, 367 ठिकाणी निवडणुका घ्या, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.

OBC Reservation: 'क्रेडिड घ्यायचा केविलवाणा प्रयत्न सुरू', ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आरोह वेलणकरचं ट्विट चर्चेत
Aroh WelankarImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 20, 2022 | 5:25 PM

राज्यात ओबीसी आरक्षणासह (Political Reservation For OBCs) निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारला आहे. बांठिया आयोगाच्या अहवालातील शिफारशीनुसार राज्यातील निवडणुका घ्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिला आहे. दोन आठवड्यात उर्वरित निवडणुका जाहीर करा, 367 ठिकाणी निवडणुका घ्या, असंही न्यायालयाने म्हटलं आहे. या निकालानंतर श्रेयवादाला सुरुवात झाली. एकीकडे भाजप नेते आणि आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण मिळाल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रसचे नेते छगन भुजबळ यांनी महाविकास आघाडी सरकारमुळेच आरक्षण मिळाल्याचा दावा केला आहे. या श्रेयवादावरून अभिनेता आरोह वेलकरणने (Aroh Welankar) एक ट्विट केलं आहे. क्रेडिड घ्यायचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे, असं त्याने म्हटलंय

‘स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा- यात मविआचे काहीही योगदान नाही! लक्षात घ्या, क्रेडिड घ्यायचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे,’ असं ट्विट आरोहने केलं आहे. विविध सामाजिक आणि राजकीय घडामोडींबाबत आरोह नेहमीच ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतो. याआधी ट्विटरच्या माध्यमातून त्याने महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती.

हे सुद्धा वाचा

ओबीसींच्या राजकीय आरक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज (बुधवार) सुनावणी झाली. इंपिरिकल डेटा तयार केल्याशिवाय ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देता येणार नाही, असा निर्णय विकास गवळी यांनी सादर केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिला होता आणि आरक्षण रद्द केलं होतं. त्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापलं होतं. राज्य सरकारने माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्या आयोगाची नियुक्ती करून हा सांख्यिकी तपशील तयार केला. राज्यातील ओबीसींची लोकसंख्या 37 टक्के असल्याचा अहवाल आयोगाने दिल्याने त्यावरूनही ओबीसी नेत्यांची मोठी नाराजी होती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारणार की नाही आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसींना पुन्हा राजकीय आरक्षण मिळणार की नाही, या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती अजय खानविलकर, न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला यांच्या त्रिसदस्यीय पीठापुढे सुनावणी झाली. अखेर सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.