Daagdi Chaawl 2: ‘चाळ काही विसरत नसते’, ‘दगडी चाळ 2’चा दमदार ट्रेलर पाहिलात का?

2015 मध्ये ‘दगळी चाळ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये पूजा सावंत, अंकुश चौधरी, मकरंद देशपांडे, संजय खापरे, यतिन कार्येकर, कमलेश सावंत यांच्या भूमिका होत्या. पहिल्या भागातील बरेच कलाकार या सीक्वेलमध्येही पहायला मिळतात.

Daagdi Chaawl 2: 'चाळ  काही विसरत नसते', 'दगडी चाळ 2'चा दमदार ट्रेलर पाहिलात का?
'दगडी चाळ 2'चा दमदार ट्रेलर पाहिलात का?Image Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 6:31 PM

चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ’ हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एखाद्या वादळासारखा आला आणि त्यानंतर ‘चुकीला माफी नाही’ असं म्हणणाऱ्या अरुण गुलाब गवळी ऊर्फ ‘डॅडीं’ची पुन्हा सर्वत्र चर्चा सुरू झाली. आता या चित्रपटाचा सीक्वेल (Daagdi Chaawl 2) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सीक्वेलमध्येही मकरंद देशपांडे (Makarand Deshpande), अंकुश चौधरी (Ankush Chaudhari) आणि पूजा सावंत मुख्य भूमिकेत पहायला मिळत आहेत. डॅडी आणि सूर्याचं नातं आपण याआधीच पाहिलं आहे. डॅडींच्या गुंडांसोबत होणाऱ्या भांडणानंतर सूर्या-डॅडींची होणारी मांडवली, ‘डोकॅलिटी’ वापरून काम करणारा सूर्या हा डॅडींचा उजवा हात बनला, त्यात सूर्याचा कौटुंबिक ताण, हे सगळं आपण यापूर्वी पाहिलं. आता हे सर्व सोडून सूर्या त्याच्या पत्नी आणि मुलासोबत सुखी संसारात रमला आहे. मात्र चुकीला माफी नाही असं म्हणत डॅडी पुन्हा एकदा सूर्याला त्यांच्यापर्यंत घेऊन येतात.

जवळपास दोन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये सीक्वेलच्या कथेची थोडीफार कल्पना येते. 2015 मध्ये ‘दगळी चाळ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये पूजा सावंत, अंकुश चौधरी, मकरंद देशपांडे, संजय खापरे, यतिन कार्येकर, कमलेश सावंत यांच्या भूमिका होत्या. पहिल्या भागातील बरेच कलाकार या सीक्वेलमध्येही पहायला मिळतात.

हे सुद्धा वाचा

डोक्यावर गांधी टोपी, पांढरा शुभ्र शर्ट-पायजमा, झुपकेदार मिशा, नजरेत आगीच्या ज्वाला, काटक शरीरयष्टी.. या शहराच्या इतिहासातील किंबहुना गँगवॉरच्या इतिहासातील एक महत्वाचं नाव.. अरुण गुलाब गवळी उर्फ डॅडी. बाकीचे सगळे डॉन देशाबाहेर पळून गेले, मात्र तो मुंबईतच राहून आपल्या मराठी लोकांच्या पाठीशी उभा राहिलेला, चाळीच्या लोकांवर होणाऱ्या अन्यायाला पोलिसांच्या आधी न्याय देणारा दगडी चाळीचा रॉबिन हूड म्हणून ओळख झाली. बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणाऱ्या ‘दगडी चाळ’मधील ‘चुकीला माफी नाही’ असं म्हणणाऱ्या अरुण गवळी यांचा दबदबा सर्वांनीच अनुभवला. ‘दगडी चाळ 1’ ला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिल्यानंतर आता या चित्रपटाचं दुसरं पर्व येत्या 18 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे.

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.