Dagdi Chawl 2: पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार डॅडीचा दबदबा; पहा अरुण गवळींच्या ‘दगडी चाळ 2’चा टीझर

तुफान कोसळणारा पाऊस आणि अनेक लोकांच्या घोळक्यातून समोर येणारे अरुण गुलाब गवळी म्हणजेच मकरंद देशपांडे यांची दमदार एन्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणार आहे हे नक्की.

Dagdi Chawl 2: पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार डॅडीचा दबदबा; पहा अरुण गवळींच्या 'दगडी चाळ 2'चा टीझर
'दगडी चाळ 2' हा चित्रपट येत्या 18 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 10:46 AM

डोक्यावर गांधी टोपी, पांढरा शुभ्र शर्ट-पायजमा, झुपकेदार मिशा, नजरेत आगीच्या ज्वाला, काटक शरीरयष्टी.. या शहराच्या इतिहासातील किंबहुना गँगवॉरच्या इतिहासातील एक महत्वाचं नाव.. अरुण गुलाब गवळी (Arun Gawli) उर्फ डॅडी (Daddy). बाकीचे सगळे डॉन देशाबाहेर पळून गेले, मात्र तो मुंबईतच राहून आपल्या मराठी लोकांच्या पाठीशी उभा राहिलेला, चाळीच्या लोकांवर होणाऱ्या अन्यायाला पोलिसांच्या आधी न्याय देणारा दगडी चाळीचा रॉबिन हूड म्हणून ओळख झाली. बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणाऱ्या ‘दगडी चाळ’मधील ‘चुकीला माफी नाही’ असं म्हणणाऱ्या अरुण गवळी यांचा दबदबा सर्वांनीच अनुभवला. नुकतीच सोशल मीडियाद्वारे या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करण्यात आली. मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ 2’ (Daagdi Chaawl 2) हा चित्रपट येत्या 18 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तुफान कोसळणारा पाऊस आणि अनेक लोकांच्या घोळक्यातून समोर येणारे अरुण गुलाब गवळी म्हणजेच मकरंद देशपांडे यांची दमदार एन्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणार आहे हे नक्की. संगीता अहिर यांनी यापूर्वी चित्रपटसृष्टीला अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. बॉलिवूडमध्ये निर्माती म्हणून नावलौकिक मिळवल्यानंतर संगीता अहिर यांनी ‘दगडी चाळ’च्या निमित्ताने मराठी चित्रपटांच्या निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता त्या ‘दगडी चाळ’चा सीक्वेल घेऊन सज्ज झाल्या आहेत.

पहा टीझर

हे सुद्धा वाचा

चित्रपटाच्या घोषणेबद्दल निर्मात्या संगीता अहिर म्हणतात, ”आज आम्हाला ‘दगडी चाळ 2’च्या प्रदर्शनाची घोषणा करताना विशेष आनंद होत आहे. ‘दगडी चाळ’ला प्रेक्षकांनी भरभरून दिलेल्या प्रतिसादामुळेच आम्ही या चित्रपटाचा सीक्वेल करण्याचा विचार केला. प्रेक्षकांसोबतच मलाही या चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता आहे. हा चित्रपट एकाच वेळी वर्ल्डवाइड रिलीज करण्याचा आमचा मानस आहे.” 2015 मध्ये ‘दगळी चाळ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये पूजा सावंत, अंकुश चौधरी, मकरंद देशपांडे, संजय खापरे, यतिन कार्येकर, कमलेश सावंत यांच्या भूमिका होत्या.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.