Video: ..अन् एकनाथ शिंदे झाले भावूक; मंचावरच प्रसाद ओकच्या पाया पडले
लोकांचा नेता, जननायक अशी ओळख असणा-या धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer) या चित्रपटाच्या टीझरची सध्या सर्वत्र चर्चा आहे. अभिनेता प्रसाद ओकने (Prasad Oak) साकारलेल्या आनंद दिघेंची झलक बघून नेटकरी अवाक् झाले आहेत.
लोकांचा नेता, जननायक अशी ओळख असणा-या धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer) या चित्रपटाच्या टीझरची सध्या सर्वत्र चर्चा आहे. अभिनेता प्रसाद ओकने (Prasad Oak) साकारलेल्या आनंद दिघेंची झलक बघून नेटकरी अवाक् झाले आहेत. केवळ दिसण्यातील साधर्म्यच नाही तर दिघे साहेबांच्या नजरेतील ती जरब, चेह-यावरचे ते तेजस्वी आणि कणखर बाण्याचे भाव, त्यांची देहबोली, संवादफेक हे सर्वच प्रसाद ओकने अत्यंत कौशल्यपूर्ण साकारलं आहे. या टीझरने एका आठवड्यात सोशल मीडियावर सत्तर लाखांहून अधिक व्ह्यूजचा टप्पा ओलांडला. नुकताच या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा मुंबईत अनेक मान्यवर आणि चित्रपटातील कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला. राज्याचे नगरविकास मंत्री तथा आमदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे संगीत प्रकाशन पार पडलं.
मुंबईत पार पडलेल्या या सोहळ्यात अभिनेता प्रसाद ओक आनंद दिघेंच्या लूकमध्ये मंचावर अवतरला. यावेळी एकनाथ शिंदे त्याला पाहून भारावून गेले. संगीत प्रकाशन सोहळ्यानंतर मंचावर सगळे फोटो काढण्यासाठी एकत्र जमले होते. सुरुवातीला प्रसाद ओक आणि एकनाथ शिंदे यांनी एकमेकांसोबत फोटो काढले. त्यानंतर एकनाथ शिंदे हे सर्वांदेखत प्रसाद ओकच्या पाया पडले. प्रसाद ओकच्या रुपात जणू आनंद दिघेच मंचावर उपस्थित असल्याचा भास त्यांना झाला.
पहा व्हिडीओ-
View this post on Instagram
यावेळी एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा दिला. चित्रपटाबद्दल बोलताना ते म्हणाले की, “आनंद दिघे हे शिवसेनेसाठी एक आधारस्तंभ होते. त्यांचे विचार चित्रपटांच्या माध्यमातून संपूर्ण जगभरात पसरावं हाच आमचा मुख्य हेतू होता. मंगेश देसाई यांनी मी घातलेला घाट पूर्ण केला आहे. प्रवीण तरडे हे आता या चित्रपटाला पुढे नेण्याचे काम करीत आहेत. आनंद दिघे हे नेहमीच स्फूर्तिदायक होते. कधीच कोणाला दुखावत नव्हते.”
धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटात एकूण पाच गाणी आहेत. यातील गुरुपौर्णिमा आणि धर्मवीर ही गाणी अविनाश-विश्वजीत या जोडीने संगीतबद्ध केली आहेत. तर गोकुळाष्टमीचं गाणं आणि आनंद हरपला हे मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीतांना चिनार-महेश या जोडीने संगीतबद्ध केलं आहे. या चित्रपटात एक दमदार पोवाडा असून तो शाहिर नंदेश उमप यांनी संगीतबद्ध केला असून त्यांनीच गायला आहे. ‘धर्मवीर मु.पो. ठाणे’ हा चित्रपट येत्या 13 मे रोजी झी स्टुडिओजच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
हेही वाचा:
Prasad Oak: “..असं असेल तर मग मी हिंदीत का काम करावं?”; प्रसाद ओकची रोखठोक भूमिका
“बॉलिवूड चित्रपट दक्षिणेत का चालत नाही?”; सलमानच्या प्रश्नाचं रामचरणने दिलं उत्तर