Lalit Prabhakar: ‘झिम्मा’च्या यशानंतर दिग्दर्शक हेमंत ढोमे घेऊन येतोय ‘सनी’
लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच 'झिम्मा' या सुपरहिट ठरलेल्या सिनेमानंतर दिग्दर्शक हेमंत ढोमेचा (Hemant Dhome) ‘सनी' (Sunny) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
गेल्या वर्षी 19 नोव्हेंबर रोजी ‘झिम्मा’ (Jhimma) या चित्रपटाने लोकांना वेड लावलं होतं. तर या वर्षी पुन्हा त्याच शुक्रवारी ‘सनी’ हा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच ‘झिम्मा’ या सुपरहिट ठरलेल्या सिनेमानंतर दिग्दर्शक हेमंत ढोमेचा (Hemant Dhome) ‘सनी’ (Sunny) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘झिम्मा’ नंतर प्रेक्षकांच्या अपेक्षा अजूनच उंचावल्या आहेत. प्रेक्षकांच्या हयाच अपेक्षांवर खरं उतरण्यासाठी बरोबर एक वर्षाने ‘सनी’ हा सिनेमा 18 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
क्रेझी फ्यु फिल्म्स आणि प्लॅनेट मराठी प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित ‘सनी’ हा सिनेमा 18 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ललित प्रभाकर यात ‘सनी’ची मध्यवर्ती भूमिका साकारत असून या सिनेमाचे दिग्दर्शन हेमंत ढोमेनं केलं आहे. अक्षय विलास बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस व उर्फी काझमी हे सिनेमाचे निर्माते आहेत. तसंच संतोष खेर, तेजस्विनी पंडित सह-निर्माते असून सिनेमाचं लेखन इरावती कर्णिक यांनी केलेलं आहे.
View this post on Instagram
दिग्दर्शक हेमंत ढोमे सिनेमाबद्दल म्हणतो, “‘झिम्मा’ला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर प्रेक्षकांशी एक वेगळं नातं तयार झालंय आणि त्या आपुलकीच्या नात्यानेच आम्ही जबाबदारीने ‘सनी’ हा सिनेमा घेऊन आलोय. आपल्या आयुष्याबद्दल चांगलं वाटायला लावणारी ही कथा प्रेक्षकांसमोर आणताना प्रचंड आनंद होतोय. प्रेक्षकांनी ज्याप्रमाणे ‘झिम्मा’ला प्रेम दिलं तसंच ते ‘सनी’लाही मिळेल अशी खात्री आहे.”