68th National Film Awards: सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार ‘गोष्ट एका पैठणीची’ला जाहीर
दिग्दर्शक शांतनू रोडे यांच्या 'गोष्ट एका पैठणीची' (Goshta Eka Paithanichi) या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची (National Film Awards) घोषणा आज (22 जुलै) झाली. हिंदी, मराठी, कन्नड, पंजाबी, तमिळ, तेलुगू, मणिपुरी यांसह इतर प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांना पुरस्कार जाहीर केला जाणार आहे. दिग्दर्शक शांतनू रोडे यांच्या ‘गोष्ट एका पैठणीची’ (Goshta Eka Paithanichi) या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर पार्श्वगायनात राहुल देशपांडे (Rahul Deshpande) यांनी बाजी मारली आहे. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे. जून या मराठी चित्रपटातील अभिनेता सिद्धार्थ मेनन याला विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे. गोदाकाठ आणि अवांछित या चित्रपटांसाठी अभिनेते किशोर कदम यांना विशेष ज्युरीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटचा पुरस्कार विवेक दुबे यांच्या ‘फनरल’ला जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार टकाटक या चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या अनिश गोसावीला जाहीर झाला आहे.
एका तरुणीच्या स्वप्नांचा प्रवास गोष्ट एका पैठणीची या चित्रपटातून उलगडण्यात आला आहे. पैठणी हा प्रत्येक स्त्रीसाठी हळवा कोपरा असतो. आपल्याकडे एकतरी पैठणी साडी असावी असं प्रत्येक स्त्रीला वाटतं. असंच एक स्वप्न, अशीच एक इच्छा या चित्रपटातील नायिकेची असते. या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि कथालेखन शंतनू रोडे यांनी केली.
Best Actor award goes to Ajay Devgan for Tanhaji: The Unsung Warrior and Suriya for Soorarai Pottru: IB Ministry#68thNationalFilmAwards pic.twitter.com/dyyHIN9XC4
— ANI (@ANI) July 22, 2022
सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अजय देवगणला ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटासाठी तर अभिनेता सूर्याला ‘सूरराय पोट्रू’साठी जाहीर झाला आहे. ‘1232 किलोमीटर मरेंगे तो वहीं जाकर’साठी विशाल भारद्वाज यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार जाहीर झाला. सामाजिक समस्यांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘जस्टिस डिलेड बट डिलिव्हर्ड’ आणि थ्री सिस्टर्स यांना घोषित करण्यात आला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार अपर्णा बालमुरली यांना ‘सूरराय पोट्रू’साठी आणि सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार ‘सायना’साठी मनोज मुंतशीर यांना जाहीर करण्यात आला.