AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tirsaat Trailer: राष्ट्रीय सायकलपटू नीरज सूर्यकांतचं अभिनयात पदार्पण, पहा ‘तिरसाट’चा ट्रेलर

वडिलांकडून मिळालेला खेळाचा वारसा पुढे चालवत नीरजनं सायकलिंग या खेळात नैपुण्य मिळवलं. जिल्हास्तरापासून सुरुवात करत राष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारली. मात्र खासगी कारणास्तव सायकलिंग बाजूला पडलं.

Tirsaat Trailer: राष्ट्रीय सायकलपटू नीरज सूर्यकांतचं अभिनयात पदार्पण, पहा 'तिरसाट'चा ट्रेलर
TirsaatImage Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: May 16, 2022 | 9:10 AM
Share

राज्य शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळालेले सूर्यकांत पवार यांचा मुलगा आणि राष्ट्रीय सायकलपटू नीरज सूर्यकांत (Neeraj Suryakant) अभिनयात पदार्पण करत आहे. 20 मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘तिरसाट’ (Tirsaat) या चित्रपटात नीरज प्रमुख भूमिकेत असून या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. नीरज सूर्यकांत आणि तेजस्विनी शिर्के ही नवी जोडी या चित्रपटातून पदार्पण करत आहे. प्रेम मिळवण्यासाठी सहन करावा लागणारा विरोध, प्रेमासाठी करावी लागणारी धडपड ‘तिरसाट’ या चित्रपटात उलगण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटातलं ‘उधाण आलंया, फ़र्मान आलंया, जीवाला या जीवाचं आवताण आलंया,’ असे बोल असलेलं गाणं आणि टीजर लाँच करण्यात आलं होता. या गाण्याला आणि टीजरला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. आता ट्रेलर प्रदर्शित करण्यात आल्यानं चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे. (Marathi Movie)

या चित्रपटात यतीन कार्येकर, ओंकार यादव, पल्लवी घुले, सुजीत चौरे, विवेक यादव, आनंद साने, रामदेव जमदाडे, नीलिमा कामने, श्रुती उबाळे यांच्यादेखील महत्वपूर्ण भूमिका आहेत. मुराद तांबोळी, मनिषा भोसले, निलेश कटके यांनी लिहिलेल्या गीतांना पी.शंकर यांनी संगीतबद्ध केले असून चित्रपटातील गाणी सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे, गायिका मुग्धा कऱ्हाडे आणि पी. शंकर यांच्या सुमधुर आवाजात स्वरबद्ध करण्यात आली आहेत. दिनेश किरवे यांच्या क्लास वन फिल्मसने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अॅड. उमेश शेडगे सहनिर्माते आहेत. निर्माता दिनेश किरवे यांनीच चित्रपटाचं लेखन केलं आहे. तर प्रदीप टोणगे आणि मंगेश शेंडगे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. पी. शंकरन यांनी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलं आहे.

पहा ट्रेलर-

वडिलांकडून मिळालेला खेळाचा वारसा पुढे चालवत नीरजनं सायकलिंग या खेळात नैपुण्य मिळवलं. जिल्हास्तरापासून सुरुवात करत राष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारली. मात्र खासगी कारणास्तव सायकलिंग बाजूला पडलं. एका चित्रपटाच्या निमित्ताने राज डावखरे, जय सुरवसे आणि सुरज टक्के या मित्रांमुळे नीरजची भेट दिग्दर्शक प्रदीप टोणगे आणि मंगेश शेंडगे यांच्याशी झाली. त्यानंतर नाटक आणि एकूणच मनोरंजन क्षेत्रातला नीरजचा प्रवास सुरू झाला. वऱ्हाड आलंय लंडनहूनसारखं नाटक, चांडाळचौकडीसारखा वेब सीरिज आणि शॉर्टफिम्स करत आता नीरज ‘तिरसाट’ या चित्रपटातून पदार्पण करत आहे.

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.