AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonalee Kulkarni: हा ड्रेस म्हणजे काही हिंट तर नव्हे? गरोदरपणाच्या चर्चांवर अखेर सोनालीने दिलं उत्तर

क्रिकेटर हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टँकोविक, टीव्ही अभिनेत्री अनिता हसनंदानी यांनीसुद्धा पोलका डॉट ड्रेस परिधान करत प्रेग्नंट असल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली होती.

Sonalee Kulkarni: हा ड्रेस म्हणजे काही हिंट तर नव्हे? गरोदरपणाच्या चर्चांवर अखेर सोनालीने दिलं उत्तर
गरोदरपणाच्या चर्चांवर अखेर सोनालीने दिलं उत्तर Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 20, 2022 | 12:23 PM

गेल्या काही वर्षांत पोलका डॉट ड्रेसचा अर्थच जणू बदलला आहे. अभिनेत्री अनुष्का शर्माने सर्वांत आधी पोलका डॉट ड्रेस (polka dot dress) परिधान करत गरोदर (pregnancy) असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर जणू हा ट्रेंडच सुरू झाला. क्रिकेटर हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टँकोविक, टीव्ही अभिनेत्री अनिता हसनंदानी यांनीसुद्धा पोलका डॉट ड्रेस परिधान करत प्रेग्नंट असल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली होती. त्यामुळे आता कोणत्याही सेलिब्रिटीने पोलका डॉट ड्रेस परिधान केला की जणू ती प्रेग्नंसीच जाहीर करणार की काय, असा प्रश्न चाहत्यांमध्ये उपस्थित होतो. असंच काहीसं मराठमोळी अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसोबत (Sonalee Kulkarni) घडलं. सोनालीचा ‘तमाशा लाईव्ह’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रीमिअरसाठी सोनालीने पोलका डॉट ड्रेस परिधान करत सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले होते. त्यावरून सोनाली लवकरच गुड न्यूज देणार की काय, असा सवाल चाहते करू लागले.

‘हा ड्रेस म्हणजे काही हिंट तर नव्हे,’ असं एका चाहत्याने कमेंट बॉक्समध्ये लिहिलं. तर ‘पोलका डॉट.. गुड न्यूज लवकरच मिळेल वाटतं’, असं दुसऱ्या युजरने म्हटलं. ‘काळा ड्रेस आणि त्यावर पांढरे ठिपके, म्हणजे तू गरोदर आहेस’, असा थेट दावाच एका नेटकऱ्याने केला. सोशल मीडियावर या चर्चांना उधाण आल्यानंतर अखेर सोनालीने त्यावर उत्तर दिलं. ‘जे सर्वजण मला विचारत आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की मी प्रेग्नंट नाही. मी नुकताच माझा ड्रीम परफॉर्मन्स तमाशा लाईव्ह या चित्रपटात दिला. तुम्हीसुद्धा थिएटरमध्ये जाऊन तो पहा,’ असं तिने लिहिलं.

हे सुद्धा वाचा

सोनालीची पोस्ट-

सोनालीचं उत्तर-

सोनालीचा ‘तमाशा लाईव्ह’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून यातील गाणी सोशल मीडियावर चांगलीच हिट ठरली आहेत. विशेष म्हणजे अभिनय आणि नृत्यासोबतच सोनालीने यातील काही गाणीसुद्धा गायली आहेत. चित्रपटात सोनालीसोबतच सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी, पुष्कर जोग, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे, भरत जाधव यांच्या भूमिका आहेत. सोनाली लवकरच ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ या रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्कराने घेरलं; सुत्रांची माहिती
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्कराने घेरलं; सुत्रांची माहिती.
पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी? देशात हालचालींना वेग
पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी? देशात हालचालींना वेग.
पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक
पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक.
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार.
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.