Dharmaveer: ‘धर्मवीर’च्या शोदरम्यान अख्खं थिएटर रिकामं; फक्त एकाच प्रेक्षकाने पाहिला चित्रपट
13 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून प्रेक्षकांनी तिकिटबारीवर एकच गर्दी केली. अशातच या चित्रपटाशी संबंधित एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये केलेली गर्दी अचानक गायब झाली.
अभिनेता प्रसाद ओकच्या (Prasad Oak) ‘धर्मवीर’ (Dharmaveer) या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला. 13 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून प्रेक्षकांनी तिकिटबारीवर एकच गर्दी केली. अशातच या चित्रपटाशी संबंधित एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये केलेली गर्दी अचानक गायब झाली. धर्मवीरचा शो पहायला अख्ख्या थिएटरमध्ये (Movie Theatre) फक्त एकच व्यक्ती होता. खुद्द प्रसाद ओकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये संपूर्ण थिएटर रिकामं असून फक्त एकच व्यक्ती चित्रपट पाहत असल्याचं दिसून येत आहे.
हा व्हिडिओ शेअर करत प्रसाद ओकने कॅप्शनमध्ये लिहिलं की, “धर्मवीरचा शो पाहायला सिनेमागृहात फक्त एकच माणूस? मराठी कलाकाराच्या बाबतीत किंवा मराठी सिनेमासृष्टीत हे कदाचित पहिल्यांदाच घडत असावं! याचं कारण हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतरच कळेल.” आता कारण नेमकं काय? तर या व्हिडिओमध्ये असलेला प्रेक्षक धर्मराज पुढे बोलताना दिसत आहे.
पहा व्हिडीओ-
View this post on Instagram
“प्रसाद ओक यांचे मी अनेक चित्रपट आजवर पाहिले आहे. त्यांची अभिनयाची शैली ही खूपच सुंदर आहे. मी हे संपूर्ण थिएटर एकट्यासाठी बुक केलं आहे. कारण चित्रपट पाहताना मला शांतता हवी होती. मला एकट्याला हा चित्रपट पाहायचा होता आणि समजून घ्यायचा होता. त्यामुळेच मी संपूर्ण चित्रपटगृह एकट्यासाठी बुक केलं”, असं तो म्हणाला. या चाहत्याच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना प्रसादने लिहिलं, “आचार्य श्री धर्मराज गुरुजी.. तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाहीये गुरुजी. असंच प्रेम, असाच आशीर्वाद कायम असू द्या हीच नम्र विनंती.”
13 मे रोजी हा चित्रपट तब्बल चारशेहून अधिक चित्रपटगृहे आणि १० हजारांहून अधिक शोज सह प्रेक्षकांच्या भेटीस आला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने हाऊसफुल्लचे बोर्ड झळकावले. ‘धर्मवीर’ने पहिल्याच आठवड्यात 13.87 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं होतं. चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक हा आनंद दिघेंच्या भूमिकेत आहे. तर एकनाथ शिंदेंची भूमिका क्षितिज दाते साकारणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका मकरंद पाध्ये या अभिनेत्याने साकारली आहे.