Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळ्यात ‘या’ चित्रपटाचा बोलबाला; मिळाले 7 पुरस्कार

प्रवाह पिक्चर पुरस्कारांची संपूर्ण यादी; पहा कोणी मारली बाजी?

प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळ्यात 'या' चित्रपटाचा बोलबाला; मिळाले 7 पुरस्कार
pravah picture awardsImage Credit source: Hotstar
Follow us
| Updated on: Sep 20, 2022 | 3:21 PM

प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळा 2022 नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावली होती. या पुरस्कार सोहळ्यात कारखानिसांची वारी, गोदावरी (Godavari), सरसेनापती हंबीरराव, मी वसंतराव यांसारख्या चित्रपटांचा बोलबाला पहायला मिळाला. मराठी चित्रपट, त्यातील कलाकार, तंत्रज्ञ मंडळी यांच्या चमकदार कामगिरीची दखल घेणारा हा सोहळा प्रेक्षकांना लवकरच प्रवाह पिक्चर वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कारखानिसांची वारी या चित्रपटाने पटकावला. तर गोदावरी या चित्रपटासाठी निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. अभिनेत्री सई ताम्हणकरने ‘पाँडिचेरी’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जितेंद्र जोशी आणि प्रसाद ओकला गोदावरी आणि धर्मवीर या चित्रपटांसाठी मिळाला.

पुरस्कारांची संपूर्ण यादी-

सर्वोत्कृष्ट कथा (Best Story) – निखिल महाजन, प्राजक्त देशमुख- चित्रपट गोदावरी सर्वोत्कृष्ट पटकथा (Best Screenplay) – मंगेश जोशी, अर्चना बोऱ्हाडे- चित्रपट- कारखानिसांची वारी. सर्वोत्कृष्ट संवाद लेखक (Best Dialogue Writer) – मंगेश जोशी, अर्चना बोऱ्हाडे – चित्रपट – कारखानिसांची वारी. सर्वोत्कृष्ट छायाचित्रण (Best Cinematographer)- महेश लिमये – चित्रपट – सरसेनापती हंबीरराव सर्वोत्कृष्ट संकलक (Best Editor) – अभिजीत देशपांडे – चित्रपट – पाँडिचेरी सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक (Best Choreographer)- (विभागून) – किरण बोरकर- राजं आलं – चित्रपट पावनखिंड आणि आशिष पाटील – बाई गं – चित्रपट चंद्रमुखी सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञ – VFX (Best VFX Supervisor)- अक्षय साळवे – चित्रपट – सरसेनापती हंबीरराव सर्वोत्कृष्ट ध्वनीयोजना (Best Sound Designer) – बेलॅान फोन्सेका- चित्रपट – गोदावरी. सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक (Best Art Director)- मदन माने – चित्रपट – सरसेनापती हंबीरराव सर्वोत्कृष्ट वेशभूषा – (Best Costume Designer) (विभागून) – अमित दिवेकर – चित्रपट – पॉंडिचेरी आणि मानसी अत्तरदे – चित्रपट – सरसेनापती हंबीरराव सर्वोत्कृष्ट रंगभूषा – (Best Makeup) सौरभ कापडे – चित्रपट – मी वसंतराव सर्वोत्कृष्ट साहसदृश्य दिग्दर्शक (Best Action Director) – प्रद्युम्नकुमार स्वेन – चित्रपट – सरसेनापती हंबीरराव सर्वोत्कृष्ट पात्र योजना (Best Casting Designer)- अजिंक्य म्हाडगुत- चित्रपट – कारखानिसांची वारी सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत (Best Backgroundmusic)- ए. व्ही. प्रफुल्लचंद्र – चित्रपट – गोदावरी सर्वोत्कृष्ट गीत (Best song) – बाई गं – चित्रपट – चंद्रमुखी सर्वोत्कृष्ट गीतकार (Best Lyrics) – वैभव जोशी – कैवल्यगान, चित्रपट – मी वसंतराव सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक (Best Music Director) – अजय अतुल – बाई गं – चित्रपट – चंद्रमुखी सर्वोत्कृष्ट गायक (Best Singer Male) – राहुल देशपांडे – खळ खळ गोदा- चित्रपट – गोदावरी सर्वोत्कृष्ट गायिका (Best Singer Female) – (विभागून) – श्रेया घोषाल – राम राम – चित्रपट – मी वसंतराव आणि श्रेया घोषाल – चंद्रा – चित्रपट – चंद्रमुखी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (Best supporting actor Male) – प्रियदर्शन जाधव – चित्रपट – गोदावरी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (Best supporting actress)- अनिता दाते – चित्रपट – मी वसंतराव सर्वोत्कृष्ट बाल कलाकार (Best Child actor)- तन्मय कुलकर्णी – चित्रपट – पाँडिचेरी सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार (Best Comedy Artist)- निर्मिती सावंत – चित्रपट – झिम्मा सर्वोत्कृष्ट खलनायक / खलनायिका (Best Villain) – नंदू माधव – चित्रपट – Y विशेष पुरस्कार (Special Jury awards)- अभिनेता – ऋतुराज वानखेडे – चित्रपट – जयंती विशेष पुरस्कार – (Special Jury awards) अभिनेता – अजय पूरकर – चित्रपट – पावनखिंड विशेष पुरस्कार (Special Jury awards) – बाल कलाकार – आर्य आढाव – चित्रपट – ये रे ये रे पावसा विशेष पुरस्कार (Special Jury Awards) – गीत – रंग लागला – तमाशा लाईव्ह प्रवाह पिक्चर विशेष पुरस्कार (Pravah Picture special award)- पावनखिंड प्रवाह पिक्चर विशेष पुरस्कार (Pravah Picture special award)- झिम्मा प्रवाह पिक्चर विशेष पुरस्कार (पदार्पण) –(Pravah picture special award)- हृता दुर्गुळे

हे सुद्धा वाचा

या पुरस्कार सोहळ्याच्या परीक्षणाची जबाबदारी अभिनेत्री रेणुका शहाणे, प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक किरण यज्ञोपोवित, ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते, ज्येष्ठ छायाचित्रकार महेश आणे, ज्येष्ठ पत्रकार-लेखक श्रीकांत बोजेवार यांनी पार पाडली.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.