AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रवीण तरडेंच्या ‘बलोच’ चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित; एका अपरिचित लढ्याची शौर्यगाथा

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. पानिपतच्या (Panipat) पराभवांनंतर बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेल्या मराठ्यांनी अनुभवलेल्या भयाण वास्तव्यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे.

प्रवीण तरडेंच्या 'बलोच' चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित; एका अपरिचित लढ्याची शौर्यगाथा
Baloch Movie posterImage Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: May 01, 2022 | 4:38 PM
Share

सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा डोळ्यांसमोर उभी करणारा धगधगता चित्रपट म्हणजे ‘बलोच’ (Baloch). महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. पानिपतच्या (Panipat) पराभवांनंतर बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेल्या मराठ्यांनी अनुभवलेल्या भयाण वास्तव्यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. या अपरिचित लढ्याची शौर्यगाथा असलेल्या या चित्रपटात प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांची प्रमुख भूमिका आहे, तर कथा, दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांचे आहे. विश्वगुंज पिक्चर्स आणि कीर्ती वराडकर फिल्म्स प्रस्तुत, जीवन जाधव, महेश करवंदे (निकम) संतोष बळी भोंगळे, नेमाराम चौधरी, जितेश मोरे, सहनिर्माते गणेश शिंदे, दत्ता काळे, सुधीर वाघोले, विजय अल्दार निर्मित हा चित्रपट 2022 मध्ये दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सोशल मीडियावर प्रदर्शित झालेल्या या पोस्टरमध्ये बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेले मराठे दिसत आहेत. त्यांच्या डोळ्यांतील धगधगणारी आग अनेक भावना व्यक्त करत आहेत. त्यामुळे आता ‘बलोच’च्या निमित्ताने पुन्हा एकदा इतिहासातील आठवणींना उजाळा मिळणार आहे.

प्रवीण तरडे हे विविध कलाकृतींच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. एकीकडे त्यांच्या ‘बलोच’ या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला असून दुसरीकडे त्यांच्या ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाचीही उत्सुकता आहे. आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रवीण तरडेंनी केलंय. त्याचसोबत ऐतिहासिक कथानक असलेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचीही प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटासाठी त्यांनी दिग्दर्शन, लेखन आणि अभिनय अशा तिन्ही जबाबदाऱ्या पेलल्या आहेत. यामध्ये त्यांची पत्नी स्नेहल तरडेसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी.
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला.
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.