Riteish Deshmukh: ‘आता वेडेपणा सुरु होणार’, ‘सलमान भाऊ’साठी रितेश देशमुखची खास पोस्ट

या चित्रपटाच्या निमित्ताने मोठ्या ब्रेकनंतर जिनिलिया मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. आषाढी एकादशीनिमित्त या चित्रपटाबाबत रितेशने एक खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने सलमान खानचे आभार मानले आहेत.

Riteish Deshmukh: 'आता वेडेपणा सुरु होणार', 'सलमान भाऊ'साठी रितेश देशमुखची खास पोस्ट
Riteish Deshmukh and Salman KhanImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 10, 2022 | 12:46 PM

रुपेरी पडद्यापासून ते खऱ्या आयुष्यातील सोबतीपर्यंत अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया डिसूझा (Genelia D’Souza) यांची जोडी नेहमीच यशस्वी ठरली आहे. मोठ्या पडद्यावर या जोडीला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. दोघंही अनेकदा चित्रपटात एकत्र दिसले आहेत. आता त्यांच्या चित्रपटांच्या यादीमध्ये आणखी एका चित्रपटाचं नाव जोडलं जात आहे. परंतु यावेळी दोघांच्या भूमिका थोड्या वेगळ्या असणार आहेत. ‘वेड’ (Ved) या मराठी चित्रपटातून रितेश दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार असून, त्याची पत्नी जिनिलिया या चित्रपटाची नायिका असणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मोठ्या ब्रेकनंतर जिनिलिया मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. आषाढी एकादशीनिमित्त या चित्रपटाबाबत रितेशने एक खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने सलमान खानचे आभार मानले आहेत.

रितेश देशमुखची पोस्ट-

‘आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. पांडुरंगाच्या साक्षीने मी मराठी चित्रपटक्षेत्रात पाऊल ठेवलं आणि आज त्याच विठूमाऊलीच्या आषाढीला सांगतांना अतिशय आनंद होतोय की मी दिग्दर्शित केलेल्या पहिल्या मराठी चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण झालं आहे. अनेक अडचणीतून मार्ग काढत मी आणि माझ्या टीमने पहिला टप्पा यशस्वीपणे गाठला आहे आणि आता पुढचा पूर्णत्वाचा प्रवास आणखी बरंच शिकवणारा असणार आहे पण जर तुमच्या पाठीशी तुमची जिवाभावाची माणसं असतील तर हा प्रवास आणखी सोपा होतो. अशाच एका जिवाभावाच्या माणसाची साथ आमच्या चित्रपटाला लाभली ते म्हणजे ‘सलमान भाऊ’. माझ्या पहिल्या मराठी चित्रपटाला भाऊंनी #लईभारी साथ दिली होती आता भाऊने माझ्या पहिल्या दिग्दर्शकीय चित्रपटात आणखी एक #वेड केलंय. थँक्यु भाऊ. लव यू. तुम्हा सर्वांच्या सदिच्छांमुळे ‘वेड’ पूर्ण झाला आहे आणि आता.. वेडेपणा सुरु होणार आहे. तेव्हा भेटूया लवकरच..’, अशी पोस्ट रितेशने लिहिली आहे.

’20 वर्षे कॅमेऱ्यासमोर राहिल्यानंतर मी पहिल्यांदाच त्याच्या मागे उभे राहण्यास तयार झालो आहे. मी माझा पहिला मराठी चित्रपट दिग्दर्शित करत असल्यामुळे, मी तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मागतो आहे. या प्रवासाचा एक भाग व्हा, या वेडाचा भाग व्हा’, अशी पोस्ट रितेशने याआधी लिहिली होती. चित्रपटात दिग्दर्शनासोबतच रितेश अभिनयाची जबाबदारीही सांभाळणार आहे. टेलिव्हिजन अभिनेत्री जिया शंकर देखील या चित्रपटाचा एक भाग आहे. पती-पत्नीला पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.