Sai Tamhankar: ‘काय झाडी.. काय डोंगुर.. काय हाटील.. एकदम ओके’, प्रियकरासोबत सई ताम्हणकरच्या फोटोवर भन्नाट कमेंट्स

अनिशच्या वाढदिवसानिमित्त सईने त्याच्यासोबतचा रोमँटिक फोटो पोस्ट केला आहे. अत्यंत निसर्गरम्य ठिकाणावरील दोघांच्या व्हेकेशनचा हा फोटो आहे. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्या लग्नाला दोघांनी एकत्र हजेरी लावली, तेव्हापासून त्यांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली.

Sai Tamhankar: 'काय झाडी.. काय डोंगुर.. काय हाटील.. एकदम ओके', प्रियकरासोबत सई ताम्हणकरच्या फोटोवर भन्नाट कमेंट्स
Sai Tamhankar, Anish Jog Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 10:37 AM

मराठीतील आघाडीची अभिनेत्री (Marathi Actress) सई ताम्हणकर (Sai Tamhankar) सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सईने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला असून त्यावर चाहत्यांसोबतच सेलिब्रिटींकडूनही कमेंट्सचा वर्षाव होत आहे. सईचा हा फोटो बॉयफ्रेंड अनिश जोगसोबतचा (Anish Jog) आहे. अनिशच्या वाढदिवसानिमित्त सईने त्याच्यासोबतचा रोमँटिक फोटो पोस्ट केला आहे. अत्यंत निसर्गरम्य ठिकाणावरील दोघांच्या व्हेकेशनचा हा फोटो आहे. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्या लग्नाला दोघांनी एकत्र हजेरी लावली, तेव्हापासून त्यांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली. इतकंच नव्हे तर काही दिवसांपूर्वी सईने अनिशचा फोटो पोस्ट करत तिच्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या होत्या.

सईने पोस्ट केलेल्या अनिशसोबतच्या फोटोंवर रसिका सुनील, मुक्ता बर्वे, अमृता खानविलकर, क्षितिज पटवर्धन, स्वप्निल जोशी या कलाकारांनी कमेंट करत हृदयाचे इमोजी पोस्ट केले आहेत. तर चाहत्यांनीसुद्धा सईच्या या फोटोवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर गाजत असलेला डायलॉग एका नेटकऱ्याने कमेंट्स बॉक्समध्ये पोस्ट केला आहे. काय झाडी.. काय डोंगुर.. काय हाटील.. एकदम ओके.. असं एकाने लिहिलंय. सईने काही दिवसांपूर्वी अनिशचा फोटो पोस्ट करत ‘साहेब, दौलतराव, सापडला’ असे हॅशटॅग वापरले होते. मात्र अद्याप माध्यमांसमोर सई किंवा अनिशने याबाबत कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.

हे सुद्धा वाचा

सईने पोस्ट केलेला फोटो-

View this post on Instagram

A post shared by Sai (@saietamhankar)

अनिशने पोस्ट केलेला फोटो-

View this post on Instagram

A post shared by Anish Joag (@anishjoag)

कोण आहे अनिश जोग?

अनिश हा चित्रपट निर्माता आहे. त्याने अनेक मराठी चित्रपटांची निर्मिती केली. टाईमप्लीज, व्हायझेड, मुरांबा, गर्लफ्रेंड, धुरळा या चित्रपटांची निर्मिती अनिशने केली. तर सईसुद्धा मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे. दुनियादारी, धुरळा, गर्लफ्रेंड, क्लासमेट्स, हंटर, वजनदार, पाँडिचेरी यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.