Siddharth Jadhav: ‘गेला आठवडाभर मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो..’; सिद्धार्थच्या पोस्टवर चाहत्यांनी व्यक्त केली काळजी

हिंदुजा हॉस्पिटलमध्ये (Hinduja Hospital) त्याच्यावर उपचार सुरू होते. सिद्धार्थने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली. त्याचसोबत हॉस्पिटलमधील फोटोसुद्धा त्याने पोस्ट केला.

Siddharth Jadhav: 'गेला आठवडाभर मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो..'; सिद्धार्थच्या पोस्टवर चाहत्यांनी व्यक्त केली काळजी
सिद्धार्थच्या पोस्टवर चाहत्यांनी व्यक्त केली काळजीImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 16, 2022 | 9:36 AM

अभिनेता सिद्धार्थ जाधवला (Siddharth Jadhav) जवळपास आठवडाभराच्या उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. हिंदुजा हॉस्पिटलमध्ये (Hinduja Hospital) त्याच्यावर उपचार सुरू होते. सिद्धार्थने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली. त्याचसोबत हॉस्पिटलमधील फोटोसुद्धा त्याने पोस्ट केला. तब्येत (Health) बरी नसताना ज्यांनी ज्यांनी काळजी घेतली, त्या सर्वांचे सिद्धार्थने या पोस्टमध्ये आभार मानले. सिद्धार्थला नेमकं काय झालं होतं, हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र आता आपली तब्येत सुधारत असल्याचं त्याने सांगितलं. ‘मी बरा व्हावा म्हणून ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांना मनापासून धन्यवाद. आता हळूहळू बरा होतोय, खूप धावपळ असते आपली, पण त्यातही स्वतःच्या हेल्थकडे दुर्लक्ष होणार नाही याची प्लीज काळजी घ्या,’ अशी विनंती त्याने चाहत्यांना केली आहे.

सिद्धार्थ जाधवची पोस्ट-

‘नमस्कार, गेला आठवडाभर मी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. आज घरी आलो. मनापासून आभार हिंदुजा हॉस्पिलच्या स्टाफचं. खूप मनापासून काळजी घेतली माझी. अभिनव महाडीक दादा आणि त्यांची संपूर्ण टीम, एका फोनवर नेहमीच धावून येणारे अमेय खोपकर दादा, शशांक नागवेकर दादा लव्ह यू ऑल्वेज. सतीश राजवडे दादा आणि स्टार प्रवाह परिवार तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा होता आणि माझा मोठा भाऊ डॉ. लवेश जाधव, जो रात्रभर जागून माझी काळजी घेत होता. मी बरा व्हावा म्हणून ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांना मनापासून धन्यवाद. आता हळूहळू बरा होतोय, खूप धावपळ असते आपली, पण त्यातही स्वतःच्या हेल्थकडे दुर्लक्ष होणार नाही याची प्लीज काळजी घ्या.

हे सुद्धा वाचा

त्याच्या या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी काळजी व्यक्त केली. प्रसाद ओक, अमृता खानविलकर, आदित्य सरपोतदार यांसारख्या सेलिब्रिटींसह चाहत्यांनी सिद्धार्थला तब्येतीची काळजी घेण्याचं आवाहन केलं. काही दिवसांपूर्वीच सिद्धार्थचा तमाशा लाईव्ह हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. यानिमित्त तो सतत प्रमोशनमध्ये व्यस्त होता. कामाचा व्याप असला तरी तब्येतीची काळजी नक्की घ्या, अशी विनंती सिद्धार्थनेही आपल्या चाहत्यांना केली आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.