Siddharth Jadhav: घटस्फोटाच्या चर्चांवर अखेर सिद्धार्थ जाधवने सोडलं मौन; म्हणाला..

तृप्तीने तिच्या सोशल मीडिया हँडलवर तृप्ती अक्कलवार असं माहेरचं आडनाव लावलं आहे. त्यामुळे या दोघांमध्ये काहीतरी बिनसलंय का, ते घटस्फोट (Divorce) घेत आहेत का, अशा चर्चांना उधाण आलं. या चर्चांवर अखेर सिद्धार्थने मौन सोडलं आहे.

Siddharth Jadhav: घटस्फोटाच्या चर्चांवर अखेर सिद्धार्थ जाधवने सोडलं मौन; म्हणाला..
Siddharth Jadhav, Trupti AkkalwarImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 10:51 AM

अभिनेता सिद्धार्थ जाधवची (Siddharth Jadhav) पत्नी तृप्ती (Trupti Jadhav) हिने सोशल मीडिया हँडलवरून ‘जाधव’ हे सासरचं आडनाव काढल्यानंतर दोघांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू झाली. सिद्धार्थ आणि तृप्ती यांच्यात काही आलबेल नसल्याचं म्हटलं जात आहे. तृप्तीने तिच्या सोशल मीडिया हँडलवर तृप्ती अक्कलवार असं माहेरचं आडनाव लावलं आहे. त्यामुळे या दोघांमध्ये काहीतरी बिनसलंय का, ते घटस्फोट (Divorce) घेत आहेत का, अशा चर्चांना उधाण आलं. या चर्चांवर अखेर सिद्धार्थने मौन सोडलं आहे. एका वेबसाइटशी बोलताना त्याने घटस्फोटाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘सब कुछ ठीक है’ असं सिद्धार्थने म्हटलंय.

‘हिंदुस्तान टाइम्स’ने सिद्धार्थची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता सुरुवातीला त्याने थोडी चिडचिड व्यक्त केली. नंतर तो म्हणाला, “या सर्व अफवा कुठून पसरवल्या जात आहेत हेच मला कळत नाही. आम्ही सोबत आहोत आणि सर्वकाही ठीक आहे.” सिद्धार्थ आणि तृप्ती हे कौटुंबिक मतभेदांमुळे गेल्या दोन वर्षांपासून वेगळे राहत असल्याचंही म्हटलं जातंय. त्याबद्दल प्रश्न विचारला असता तो पुन्हा म्हणाला, “सब कुछ ठीक है”. सिद्धार्थने यापुढे काही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

हे सुद्धा वाचा

सिद्धार्थची पोस्ट-

तृप्ती आणि सिद्धार्थ यांचं सोशल मीडिया अकाऊंट पाहिलं असता गेल्या दोन वर्षांपासून दोघांनी एकमेकांसाठी एकही पोस्ट केलेली नाही. कार्यक्रम किंवा पार्ट्यांमध्येही दोघं एकत्र दिसले नाहीत. इतकंच नव्हे तर सोशल मीडियावर दोघांनीही एकमेकांना अनफॉलो केलं आहे.

तृप्ती कॉलेजमध्ये असताना जर्नलिस्मचा कोर्स करत होती. तेव्हा ती ‘राम भरोसे’ या नाटकाच्या ऑडिशनसाठी गेली होती. तिकडे सिद्धू आणि तृप्तीची ओळख झाली. सिद्धार्थसाठी तर हा ‘लव्ह अॅट फर्स्ट साइट’ असा प्रकार होता. कारण भेटल्यानंतर तीन-चार दिवसांतच तृप्ती हे नाटक करू शकणार नाही असं लक्षात येताच त्याने एलफिन्स्टन स्टेशनवर तृप्तीला प्रपोजसुद्धा करून टाकलं. त्यावेळी तृप्तीला हे पटलं नव्हतं आणि सुरुवातीला तिने सिद्धार्थला नकार दिला होता. त्यानंतर पुढील तीन-चार वर्षांत दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि त्यानंतर तृप्तीने लग्नाला होकार दिला. 2007 मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. सिद्धार्थ आणि तृप्ती यांना स्वरा आणि इरा या दोन मुली आहेत.

मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.