सिंधुदुर्गात रंगणार पहिला कोकण चित्रपट महोत्सव

कोकण (Kokan) म्हटलं की आपल्या डोळयासमोर उभं राहतं ते तिथलं विलोभनीय निसर्गसौंदर्य. कोकणाला लाभलेला समुद्रकिनारा आणि डोंगराळ भाग हे पर्यटनाचे आकर्षण आहे. कोकणाला मोठा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. अनेक उत्तमोत्तम कलाकृती आणि उत्कृष्ट कलाकार कोकणाने चित्रपटसृष्टीला दिले आहेत.

सिंधुदुर्गात रंगणार पहिला कोकण चित्रपट महोत्सव
Konkan Film FestivalImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Mar 28, 2022 | 4:19 PM

कोकण (Kokan) म्हटलं की आपल्या डोळयासमोर उभं राहतं ते तिथलं विलोभनीय निसर्गसौंदर्य. कोकणाला लाभलेला समुद्रकिनारा आणि डोंगराळ भाग हे पर्यटनाचे आकर्षण आहे. कोकणाला मोठा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. अनेक उत्तमोत्तम कलाकृती आणि उत्कृष्ट कलाकार कोकणाने चित्रपटसृष्टीला दिले आहेत. कोकणातील या सांस्कृतिक प्रतिभेचा अधिकाधिक विस्तार व तिथल्या गुणी कलाकारांना वाव मिळावा यासाठी ‘सिंधुरत्न कलावंत मंच’ या संस्थेतर्फे सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात ९ मे ते १४ मे या कालावधीत कोकण चित्रपट महोत्सवाचे (Konkan Film Festival) आयोजन करण्यात येणार आहे. ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर, ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल, विजय राणे, छाया कदम, निशा परुळेकर, प्रमोद मोहिते, अमीर हडकर, प्रकाश जाधव, यश सुर्वे आदि मंडळींनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

या महोत्सवाअंतर्गत जिल्ह्यातील आठही तालुक्यात निवडक १० मराठी चित्रपट दाखवण्यात येतील. प्रथम तीन क्रमांकाच्या चित्रपटांना मानांकन देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार असून सर्वोत्कृष्ट कलाकार, तंत्रञ यांना गौरविण्यात येणार आहे. तसेच आतापर्यंत चित्रपटसृष्टी व सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या कोकणातील सिंधुरत्नांचा गौरव यावेळी केला जाईल. स्पर्धेसाठी २०१९ ते २०२१ या कालावधीत सेन्सॉर झालेल्या मराठी चित्रपटांना सहभागी होता येईल. चित्रपट निर्मीती संस्थांनी kokanchitrapatmahotsav.com या वेबसाइटवर आपले अर्ज सादर करायचे आहेत. १ एप्रिलपासून यासाठी प्रवेशअर्ज करता येतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल आहे. या महोत्सवाच्या स्पर्धा विभागासाठी रुपये १०००/-(रुपये एक हजार) प्रवेशिका फी आकारण्यात येणार आहे. अर्ज सादर केलेल्या चित्रपट संस्थानी आपले चित्रपट mov फॉरमेट मध्ये पेनड्राइव्हवर आणून देणे बंधनकारक आहे.

या महोत्सवाच्या निमित्ताने कोकणातील निसर्गसौंदर्य व सांस्कृतिक वैभव सर्वदूर पोहोचविण्यासोबत इतरत्र काय सुरु आहे याची जाणीव स्थानिकांना व्हावी, स्थानिक कलाकारांना वाव मिळावा यासाठी हा कोकण चित्रपट महोत्सव आयोजित केल्याचे ‘सिंधुरत्न कलावंत मंच’ संस्थेचे अध्यक्ष अभिनेते विजय पाटकर यांनी सांगितले. या मंचाच्या माध्यमातून पुढील काळात कोकणात जास्तीत जास्त चित्रपटांचे चित्रीकरण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. जेणेकरून येथील पर्यटन वाढण्यासाठी चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून चालना मिळेल व त्यातून स्थानिक कलाकारांना संधी, रोजगार उपलब्ध होईल.

हेही वाचा:

Oscar मधल्या विल स्मिथ प्रकारावर नीतू कपूर यांची प्रतिक्रिया; ‘म्हणे महिला भावनांना…’

Lock Upp: “करिअरला रुळावर आणण्यासाठी मी वशीकरण केलं होतं”; अभिनेत्रीचा खुलासा

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.