‘वागले की दुनिया’मधील सखीचं रुपेरी पडद्यावर पदार्पण; ‘येरे येरे पावसा’मध्ये साकारणार भूमिका

चिन्मयीने (Chinmayee Salvi) दूरदर्शन वाहिनीवरील ‘दम दमा दम’, ई टीव्ही मराठी वाहिनीवरील फूल टू धमाल, कलर्स मराठी वाहिनीवरील ‘ढोलकीच्या तालावर’ यासारख्या स्पर्धांमध्ये बाजी मारत आपला वेगळा ठसा उमटवला होता.

'वागले की दुनिया'मधील सखीचं रुपेरी पडद्यावर पदार्पण; 'येरे येरे पावसा'मध्ये साकारणार भूमिका
Chinmayee SalviImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 11:17 AM

‘तू माझा सांगाती’, ‘छोटी मालकीन’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’ अशा मराठी मालिकांमधून आणि ‘वागले की दुनिया’ (Wagle Ki Duniya) या हिंदी मालिकेतून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री चिन्मयी साळवी (Chinmayee Salvi) आता मराठी रुपेरी पडदयावर पदार्पण करणार आहे. आगामी ‘येरे येरे पावसा’ (Ye re Ye re Pavsa) या चित्रपटामध्ये तिचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. येत्या 17 जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शारीक खान यांची असून दिग्दर्शन शफक खान यांनी केले आहे. नृत्यनिपुण आणि अभिनयाची आवड असणाऱ्या चिन्मयीने दूरदर्शन वाहिनीवरील ‘दम दमा दम’, ई टीव्ही मराठी वाहिनीवरील फूल टू धमाल, कलर्स मराठी वाहिनीवरील ‘ढोलकीच्या तालावर’ यासारख्या स्पर्धांमध्ये बाजी मारत आपला वेगळा ठसा उमटवला होता.

‘येरे येरे पावसा’ या चित्रपटात अंजली ही व्यक्तिरेखा चिन्मयी साकारत आहे. “चित्रपटातील माझ्या भूमिकेला प्रेमाची वेगळी किनार आहे, जी प्रत्येकाला स्पर्शून जाणारी असेल. कॉलेजमध्ये एकांकिका करत असताना चित्रपटातील या भूमिकेसाठी मला विचारणा झाली. प्रत्येकाला चित्रपटाच्या माध्यमातून मोठया पडदयावर काम करायची इच्छा असते. येरे येरे पावसा’च्या निमित्ताने माझं स्वप्न पूर्ण झालं आहे. काही तरी सांगू पाहणारा हा चित्रपट प्रत्येकाने नक्की पहायला हवा,” असं ती सांगते.

हे सुद्धा वाचा

पहा फोटो-

‘येरे येरे पावसा’ या चित्रपटात चिन्मयीसोबत छाया कदम, मिलिंद शिंदे, संदेश जाधव, विनायक पोतदार, आर्या आढाव, प्रदीप नवले, प्राजक्ता वाड्ये, वैभव जेऊघाले पाटील, हृषीकेश करळे, नकुल चौधरी, वैष्णवी रानमाळे, उत्कर्ष करळे, अचला पांचाळ, प्रज्ञा गोपाले यांच्या भूमिका आहेत. ‘एस.क्यूब फिल्म्स इंडिया एलएलपी’ यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली असून सहनिर्मिती अँन्या झँग (बटरफ्लाय फिल्म्स) यांची आहे. ग्यानचंद चौहान, सुमेध गायकवाड कार्यकारी निर्माते आहेत. चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी योगेश एम.कोळी यांनी सांभाळली असून संकलन चंदन अरोरा यांनी केले आहे. कथा भूषण दळवी तर पटकथा शफक खान, भूषण दळवी यांची आहे. संवाद अभिषेक करगुटकर, विनोद जाधव यांनी लिहिले आहेत. अमोल पोवळे यांनी लिहिलेल्या गीतांना सुशांत पवार, किशोर पवार यांनी संगीत दिले आहे. अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांचा स्वरसाज चित्रपटातील गीतांना लाभला आहे. साऊंड झाकीर हुसैन तर कलादिग्दर्शन योगेश इंगळे यांचे आहे.

“महादेव मुंडेचे खुनी 15 दिवसात जेलमध्ये...”, धस यांचा पुन्हा हल्लाबोल
“महादेव मुंडेचे खुनी 15 दिवसात जेलमध्ये...”, धस यांचा पुन्हा हल्लाबोल.
पालिका निवडणुकीच्या तोंडावर धक्का, महिला नेत्या धनुष्यबाण हाती घेणार
पालिका निवडणुकीच्या तोंडावर धक्का, महिला नेत्या धनुष्यबाण हाती घेणार.
'वाल्मिक खडा तो वो सरकार से बडा...'; आव्हाडांचा पुन्हा हल्लाबोल
'वाल्मिक खडा तो वो सरकार से बडा...'; आव्हाडांचा पुन्हा हल्लाबोल.
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात निवडणूक लढवणार, उद्धव ठाकरेंची रणनिती ठरली
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात निवडणूक लढवणार, उद्धव ठाकरेंची रणनिती ठरली.
कराडला ICU मध्ये ठेवणारा डॉक्टर वादाच्या भोवऱ्यात; दमानियांकडून आरोप
कराडला ICU मध्ये ठेवणारा डॉक्टर वादाच्या भोवऱ्यात; दमानियांकडून आरोप.
VIDEO : मराठी समालोचनावरुन हॉटस्टारच्या कार्यालयात धडकले मनसेचे नेते
VIDEO : मराठी समालोचनावरुन हॉटस्टारच्या कार्यालयात धडकले मनसेचे नेते.
परंड्यात एसटी बसचा अपघात, रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर बस आदळली
परंड्यात एसटी बसचा अपघात, रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर बस आदळली.
त्या 26 पोलीस अधिकाऱ्यांची बदली करा, तृप्ती देसाईंची फडणवीसांकडे मागणी
त्या 26 पोलीस अधिकाऱ्यांची बदली करा, तृप्ती देसाईंची फडणवीसांकडे मागणी.
‘छावा’ सिनेमातील ‘तो’ सीन काढला; मंत्री उदय सामंत यांची माहिती
‘छावा’ सिनेमातील ‘तो’ सीन काढला; मंत्री उदय सामंत यांची माहिती.
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी; अपात्र तरी भरला अर्ज,पैसे घेणार रिटर्न?
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी; अपात्र तरी भरला अर्ज,पैसे घेणार रिटर्न?.