Drishyam 3: पुन्हा रंगणार रहस्याचा खेळ; मोहनलाल यांच्या ‘दृश्यम 3’ची घोषणा

2015 मध्ये दृश्यमचा हिंदी रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये अजय देवगण, तब्बू आणि श्रिया सरन यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

Drishyam 3: पुन्हा रंगणार रहस्याचा खेळ; मोहनलाल यांच्या 'दृश्यम 3'ची घोषणा
मोहनलाल यांच्या 'दृश्यम 3'ची घोषणा Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Aug 28, 2022 | 6:05 PM

चित्रपट निर्माते अँटनी पेरुंबवूर यांनी ‘दृश्यम 3’ (Drishyam 3) या चित्रपटाची घोषणा केली आहे. मोहनलाल (Mohanlal) यांची मुख्य भूमिका असलेल्या या प्रसिद्ध चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची घोषणा नुकत्याच एका पुरस्कार सोहळ्यात झाली. तिसऱ्या भागातही मोहनलाल हेच जॉर्जकुट्टीची (Georgekutty) भूमिका साकारणार आहेत. दृश्यम हा चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्यानंतर गेल्या वर्षी या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. दृश्यम 3 ची घोषणा होताच सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून आनंद व्यक्त करण्यात आला. ज्या पुरस्कार सोहळ्यात अँटनी यांनी चित्रपटाची घोषणा केली, त्याचा व्हिडीओसुद्धा ट्विटरवर व्हायरल होत आहे. रहस्याने परिपूर्ण असलेल्या या चित्रपटाच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळाला होता.

2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या दृश्यम या मल्याळम चित्रपटाचं दिग्दर्शन जितू जोसेफने केल होतं. यामध्ये मोहनलाल, मीना दुरईराज आणि अनसिबा हासन यांच्या मुख्य भूमिका होत्या. प्रेक्षक-समिक्षकांकडून या चित्रपटाला दमदार प्रतिसाद मिळाला होता. त्याचा सीक्वेल ‘दृश्यम 2: द सिजप्शन’ हा गेल्या वर्षी ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झाला. सीक्वेलवरही प्रेक्षकांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला होता.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Mohanlal (@mohanlal)

2015 मध्ये दृश्यमचा हिंदी रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये अजय देवगण, तब्बू आणि श्रिया सरन यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. यावर्षी जून महिन्यात हैदराबादमध्ये दुसऱ्या भागाचं शूटिंग पार पाडलं. दृश्यम 2 चा हिंदी रिमेक येत्या 18 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हिंदीसोबतच हा चित्रपट कन्नड, तमिळ आणि तेलुगूमध्येही प्रदर्शित झाला.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.