Shamshera Review: कसा आहे बाप होणाऱ्या रणबीर कपूरचा शमशेरा? तरण आदर्शची रेटींग आलियाचीही झोप उडवेल!

जवळपास 150 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट डिसेंबर 2019 मध्ये प्रदर्शित होणार होता, पण कोरोनामुळे तो जवळपास अडीच वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Shamshera Review: कसा आहे बाप होणाऱ्या रणबीर कपूरचा शमशेरा? तरण आदर्शची रेटींग आलियाचीही झोप उडवेल!
Shamshera Movie ReviewImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 3:17 PM

जवळपास चार वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणाऱ्या अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) चित्रपट ‘शमशेरा’ (Shamshera) जगभरात प्रदर्शित झाला आहे. जवळपास 150 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट डिसेंबर 2019 मध्ये प्रदर्शित होणार होता, पण कोरोनामुळे तो जवळपास अडीच वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात रणबीर कपूरसोबतच वाणी कपूर, संजय दत्त (Sanjay Dutt), सौरभ शुक्ला आणि रोनित रॉय यांच्याही भूमिका आहेत. तर करण मल्होत्राने चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. रणबीर हा अभिनेता म्हणून जरी उत्तम असला तरी अनेकदा चित्रपटाची पटकथा त्या तोडीची नसल्याने त्याच्या वाट्याला अपेक्षित यश येत नाही. ‘शमशेरा’च्या बाबतीतही या गोष्टीची प्रचिती येते. जवळपास चार वर्षांनंतर रणबीरचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मात्र प्रत्यक्षात तो चित्रपट पाहिल्यानंतर ‘पैसा वसूल’ची भावना मनात येत नाही.

‘शमशेरा’ची कथा

हा चित्रपट 18 व्या शतकातील ब्रिटीश काळातील काझा या काल्पनिक शहराची कथा सांगतो. राजपूत काळात मुघलांशी लढलेले खमेरन जातीचे लोक आश्रयाच्या शोधात काझाला पोहोचतात तेव्हा तिथले उच्चवर्णीय लोक त्यांना स्वीकारत नाहीत. मग त्यांचा सरदार शमशेरा (रणबीर कपूर) त्याच्या साथीदारांसह काझामध्ये उदरनिर्वाहासाठी लूटमार करण्यास सुरुवात करतो. यानंतर काझामधील लोक इंग्रजांच्या दरबारात खमेरन लोकांविरुद्ध तक्रार करतात. तेव्हा सरकार इन्स्पेक्टर शुद्ध सिंग (संजय दत्त) याला पाठवतात आणि तो शमशेरा आणि त्याच्या साथीदारांना फसवून काझा किल्ल्यात गुलाम बनवून ठेवतो.

हे सुद्धा वाचा

शमशेरा आपल्या साथीदारांना सोडवण्याच्या प्रयत्नात आपला जीव देतो. त्यानंतर, 25 वर्षांनंतर पुन्हा कथा सुरू होते, जेव्हा शमशेराचा मुलगा बल्ली (रणबीर कपूर) जो हुबेहूब त्याच्या वडिलांसारखा दिसतो तो वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरतो. त्याचा सामना इन्स्पेक्टर शुद्ध सिंगशीही होतो. बल्ली आपल्या वडिलांचं खमेरन स्वातंत्र्याचं स्वप्न पूर्ण करू शकेल का, हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यावर समजू शकेल.

‘शमशेरा’चा रिव्ह्यू

चित्रपटाचे दिग्दर्शक करण मल्होत्रा ​​यांनी भव्य सेट, उत्तम सिनेमॅटोग्राफी, उत्कृष्ट पार्श्वभूमी आणि संजय दत्त आणि रणबीर कपूरसारख्या अनुभवी कलाकारांच्या मदतीने अत्यंत भव्यदिव्य चित्रपट बनविण्यात कोणतीही कसर सोडली नाही. पण, चित्रपटाची कमकुवत पटकथा आणि संवादांमुळे तो त्यात यशस्वी होऊ शकला नाही. मध्यंतरापासून क्लायमॅक्सपर्यंत अशी अनेक दृश्ये चित्रपटात आहेत, जी प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरतात. पण कथेच्या लांबीमुळे काही काळानंतर त्यातूनही रस निघून जातो. चित्रपटातील एक-दोन गाणी सोडली तर बाकीची गाणी गरज नसतानाही समाविष्ट केल्यासारखे वाटतात.

पहा ट्रेलर-

जवळपास साडेतीन तासांचा हा चित्रपट किमान अर्धा तास तरी कमी करता आला असता. ‘शमशेरा’ला पचनी न पडणारा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ आणि ‘केजीएफ’चा कॉकटेल म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. रणबीरने चित्रपटात उत्तम काम केलं आहे. तर संजय दत्तनेही आपली छाप सोडली आहे. काही दृश्यांमध्ये तो बालिशदेखील वाटतो. तर वाणी कपूरला या चित्रपटात डान्स आणि रोमान्सव्यतिरिक्त काही खास काम देण्यात आलं नाही. सौरभ शुक्ला आणि रोनित रॉय यांच्याही भूमिका चांगल्या आहेत.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने शमशेराला दिला दीड स्टार

शमशेरा का पाहावा?: जर तुम्ही रणबीर कपूरचे खूप मोठे चाहते असाल तर हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पहा. अन्यथा OTT वर तो येण्याची वाट पाहू शकता.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.