Mukesh Khanna: “जर एखादी मुलगी तुमच्याकडे सेक्सची मागणी करत असेल तर..”; मुकेश खन्ना यांच्या विधानावर भडकले नेटकरी

नुकताच त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे, ज्यामध्ये ते अशा काही गोष्टी सांगत आहेत, जे ऐकल्यानंतर यूजर्सनी संताप व्यक्त केला आहे.

Mukesh Khanna: जर एखादी मुलगी तुमच्याकडे सेक्सची मागणी करत असेल तर..; मुकेश खन्ना यांच्या विधानावर भडकले नेटकरी
Mukesh KhannaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 11:31 AM

अभिनेता मुकेश खन्ना (Mukesh Khanna) सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. सोशल मीडियावर ते अनेकदा कोणत्या ना कोणत्या विषयावर आपली मतं मांडत असतात. नुकताच त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे, ज्यामध्ये ते अशा काही गोष्टी सांगत आहेत, जे ऐकल्यानंतर यूजर्सनी संताप व्यक्त केला आहे. या व्हिडिओमध्ये मुकेश खन्ना म्हणत आहेत की, “जी मुलगी एका मुलाला सेक्ससाठी विचारते, ती मुलगी नसून ती सेक्सचा व्यवसाय करत असते. लोकांनी अशा गोष्टींमध्ये पडू नये.” मुलींबद्दलच्या त्यांच्या याच वक्तव्यावर नेटकरी भडकले आहेत. त्यांच्या या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया (Trolling) येत आहेत.

नेमकं काय म्हणाले मुकेश खन्ना?

शक्तीमान या मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेते मुकेश खन्ना त्यांच्या या व्हिडीओमध्ये म्हणाले, “जर एखाद्या मुलीने एखाद्या मुलाला सांगितलं की मला तुझ्याशी शारीरिक संबंध ठेवायचे आहेत, तर तो तिचा व्यवसाय आहे. कारण कोणत्याही सुसंस्कृत समाजातील मुलगी असं म्हणणार नाही. असं म्हणणारी मुलगी निर्लज्ज असते, त्यामुळे तिच्या पापात सहभागी होऊ नका.” मुकेश यांनी त्यांच्या भीष्म इंटरनॅशनल या युट्यूब चॅनलवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘क्या आपको भी ऐसी लडकीयाँ लुभाती है?’ असं या व्हिडीओचं शीर्षक त्यांनी दिलंय.

हे सुद्धा वाचा

नेटकऱ्यांचा संताप

मुकेश खन्ना यांच्या या व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करत त्यांना फटकारत आहेत. एका युजरने म्हटलं, ‘ठीक आहे, आता सिव्हिल सोसायटीचा व्हिडीओ बनवा.’ तर दुसर्‍याने लिहिलं, ‘जेव्हा शक्ती आणि मान या दोन्ही गोष्टी तुमच्यातून निघून जातात.’ आणखी एका युजरने शक्तीमानमधलाच संवाद उपरोधिकरित्या लिहिला. ‘अंधेरा कायम रहे’ असं त्या नेटकऱ्याने लिहिलं.

मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.