Nithya Menon: मानसिक छळाविषयी पत्रकार परिषदेत व्यक्त झाली अभिनेत्री; म्हणाली “विविध 30 नंबरवरून फोन करून द्यायचा त्रास”

नित्या मेननने माध्यमांना सांगितलं की, "संतोष वर्के हा गेल्या 6 वर्षांपासून माझ्यावर प्रेम करतो, असं सांगून मला त्रास देत होता. तो मला विविध नंबरवरून फोन करायचा."

Nithya Menon: मानसिक छळाविषयी पत्रकार परिषदेत व्यक्त झाली अभिनेत्री; म्हणाली विविध 30 नंबरवरून फोन करून द्यायचा त्रास
Nithya Menon: मानसिक छळाविषयी पत्रकार परिषदेत व्यक्त झाली अभिनेत्रीImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 07, 2022 | 4:18 PM

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री नित्या मेनन (Nithya Menon) ही ‘ब्रीद इन्टू द शॅडो’मध्ये अभिनेता अभिषेक बच्चनसोबत दिसली होती. नित्याचा जन्म बेंगळुरूतील एका मल्याळम कुटुंबात झाला. अभिनेता सिद्धार्थसोबत 180 या चित्रपटातून तिने तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. आता ती धनुषसोबत तिरुचित्रंबलममध्ये झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी संतोष वर्के (Santhosh Varkey) नावाच्या एका व्यक्तीने कबूल केलं होतं की त्याला नित्या खूप आवडते आणि तो तिच्याशी लग्न करणार आहे. त्यावेळी नित्या लग्न करणार असल्याची अफवा पसरली होती. या चर्चांनंतर नित्याने व्हिडिओ पोस्ट करत स्पष्टीकरणसुद्धा दिलं होतं. लग्न करण्याचा निर्णय अद्याप घेतला नसल्याचं तिने म्हटलं होतं. त्यानंतर जेव्हा ती तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मीडियासमोर गेली तेव्हा तिला पुन्हा तोच प्रश्न विचारण्यात आला. यावर प्रत्युत्तर देताना नित्याने संतोष वर्के याचा उल्लेख करून तो तिचा मानसिक छळ (Mental Harassment) करत असल्याचा खुलासा केला.

नित्या मेननला वेगवेगळ्या 30 नंबरवरून कॉल येत होते

नित्या मेननने माध्यमांना सांगितलं की, “संतोष वर्के हा गेल्या 6 वर्षांपासून माझ्यावर प्रेम करतो, असं सांगून मला त्रास देत होता. तो मला विविध नंबरवरून फोन करायचा. त्याने मला वेगवेगळ्या 30 नंबरवरून कॉल केले होते आणि मी सगळ्यांना ब्लॉक केलं. संतोष मलाच नाही तर माझ्या वडिलांना आणि आईलाही फोन करून त्रास देत होता. तसं ते रागाने कोणाशी बोलत नाहीत. पण त्यांचा राग संतोषवर निघाला. त्यांनी मला त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यास सांगितलं. पण मी जाऊ दिलं. त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल असा विचार करून मी दुर्लक्ष केलं. पण आता तो त्याचा अतिरेक करत आहे.”

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Nithya Menen (@nithyamenen)

नित्याच्या आरोपांवर संतोष वर्केची प्रतिक्रिया

नित्याच्या या आरोपांवर संतोषने प्रतिक्रिया दिली. “नित्याने सांगितलं की मी तिला विविध 30 नंबरवरून कॉल करून त्रास दिला. पण एकटा माणूस त्याच्या नावावर किती सिम कार्ड खरेदी करू शकतो याचा विचार लोक करू शकतात. फक्त नित्याच नाही तर तिची आई पण म्हणाली होती की ती दुसऱ्याशी लग्न करणार आहे. पण वडिलांनी या गोष्टींना साफ नकार दिला होता. त्यामुळे मी स्वतः गोंधळून गेलो आहे की हे लोक वेगळं का बोलत आहेत? हे लोक माझ्यावर लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती मला मिळाली आहे. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर मी माझ्या कामात व्यस्त असतो. मी कोणाच्याही आयुष्यात ढवळाढवळ करत नाही आणि जर मला हे सर्व माहित असतं तर मी तिच्या प्रेमात पडलो नसतो,” असं तो म्हणाला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.