नोराची ठसकेबाज लावणी पाहून माधुरीने वाजवली शिट्टी; Video एकदा पहाच!

'वाजले की बारा' गाण्यावर नोरा फतेहीची ठसकेबाज लावणी

नोराची ठसकेबाज लावणी पाहून माधुरीने वाजवली शिट्टी; Video एकदा पहाच!
Nora Fatehi and Madhuri DixitImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 28, 2022 | 7:45 PM

मुंबई- डान्सर आणि अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) ही तिच्या बेली डान्ससाठी विशेष ओळखली जाते. ‘हाय गर्मी’, ‘ओ साकी साकी’ या गाण्यांवर तिने अफलातून डान्स केला. नोरा सध्या ‘झलक दिखला जा 10’ (Jhalak Dikhala Ja 10) या डान्सिंग शोमध्ये जजच्या भूमिकेत आहे. या शोच्या नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये तिने ठसकेबाज लावणी (Lavani) सादरी केली. तिची ही लावणी पाहून माधुरी दीक्षितलाही शिट्टी वाजवण्याचा मोह आवरला नाही. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

कलर्स टीव्हीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या खास एपिसोडमध्ये नोराने हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे. नऊवारी साडी, नाकात नथ, भरजरी दागिने असा तिचा लूक आहे. या एपिसोडमध्ये अमृता खानलविलकर लावणी करताना दिसणार आहे.

हे सुद्धा वाचा

अमृताचा परफॉर्मन्स झाल्यानंतर माधुरी नोरालाही लावणी सादर करण्याची विनंती करते. माधुरीच्या विनंतीनंतर नोरा मंचावर येऊन अमृतासोबत ‘वाजले की बारा’ या गाण्यावर ठसकेबाज लावणी सादर करते. नोरा तिच्या अदाकारीने उपस्थितांची मनं जिंकते.

पहा व्हिडीओ-

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

नोराचा परफॉर्मन्स संपल्यानंतर माधुरी खूश होऊन शिट्टी वाजवते आणि उभी राहून तिच्यासाठी टाळ्या वाजवते. नोरा आणि माधुरीसोबतच करण जोहरसुद्धा या शोचा जज आहे. अमृता खानविलकर, गश्मीर महाजनी, अली असगर, रुबिना दिलैक यांसारख्या सेलिब्रिटींनी यंदाच्या सिझनमध्ये भाग घेतला आहे. जवळपास पाच वर्षांनंतर झलक दिखला जा हा डान्सिंग शो पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.