OTT: वीकेंडला ओटीटीवर काय पहावं याचा विचार करत असाल, तर एकदा ‘हे’ नक्की वाचा!

ओटीटीवर सध्या काय पहावा याचा विचार करत असाल, तर ही यादी एकदा नक्की बघा. दिल्ली क्राईम आणि महारानी या वेब सीरिजचे दुसरे भाग ओटीटीवर प्रदर्शित झाले आहेत. या सीरिजच्या पहिल्या भागांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता.

OTT: वीकेंडला ओटीटीवर काय पहावं याचा विचार करत असाल, तर एकदा 'हे' नक्की वाचा!
OTT: वीकेंडला ओटीटीवर काय पहावं याचा विचार करत असाल, तर एकदा 'हे' नक्की वाचा!Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 11:47 AM

या वीकेंडला ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT) विविध विषयांवरील सीरिज आणि चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. यामध्ये दिल्ली क्राईम 2 (Delhi Crime 2), महारानी 2 (Maharani 2), क्रिमिनल जस्टीस S3 यांचा समावेश आहे. ओटीटीवर सध्या काय पहावा याचा विचार करत असाल, तर ही यादी एकदा नक्की बघा. दिल्ली क्राईम आणि महारानी या वेब सीरिजचे दुसरे भाग ओटीटीवर प्रदर्शित झाले आहेत. या सीरिजच्या पहिल्या भागांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. कलाकारांचं दमदार अभिनय आणि आशयघन कथा असल्याने प्रेक्षकांनी या सीरिजना पसंती दर्शविली. या आठवड्यात इतर कोणते सीरिज आणि चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, ते पाहुयात..

1- दिल्ली क्राईम 2 (Delhi Crime 2)- ही सीरिज ओटीटीवर प्रदर्शित झाली असून प्रेक्षकांकडून त्यावर भरभरून कौतुकाचा वर्षाव होतोय. यामध्ये शेफाली शाह, रसिका दुग्गल, आदिल हुसैन यांसह इतरही कलाकारांच्या भूमिका आहेत. शेफाली शाहने दमदार अभिनय केल्याचं मत नेटकऱ्यांनी नोंदवलंय. कुठे पाहू शकता?- नेटफ्लिक्स प्रदर्शनाची तारीख- 26 ऑगस्ट

2- हिट: द फर्स्ट केस (Hit: The First Case)- तेलुगू चित्रपट ‘हिट’चा हा हिंदी रिमेक असून यामध्ये राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रा यांच्या मुख्य भूमिका आहेत. याशिवाय संजय नार्वेकर, अपर्णा बायपेयी आणि मिलिंद गुणाजी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. कुठे पाहू शकता?- नेटफ्लिक्स प्रदर्शनाची तारीख- 28 ऑगस्ट

हे सुद्धा वाचा

3- महारानी 2 (Maharani 2)- रविंद्र गौतम दिग्दर्शित या सीरिजमध्ये अभिनेत्री हुमा कुरेशीची मुख्य भूमिका आहे. या सीरिजच्या कथेने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. दुसऱ्या सिझनवरही सोशल मीडियाद्वारे कौतुकाचा वर्षाव होत आहे. कुठे पाहू शकता?- सोनी लिव्ह प्रदर्शनाची तारीख- 25 ऑगस्ट

4- मिलिटरी प्रॉसिक्युटर डॉबरमॅन (Military Prosecutor Doberman)- मिलिटरी प्रॉसिक्युटर डॉबरमॅन ही कोरियन सीरिज असून जीन चान-ग्यु यांनी त्याचं दिग्दर्शन केलंय. यामध्ये आहन बो-ह्युन आणि जो बो-आह यांच्या मुख्य भूमिका आहेत. कोरियन ड्रामाची आवड असल्यास ही सीरिज तुम्ही नक्की पाहू शकता. कुठे पाहू शकता?- नेटफ्लिक्स प्रदर्शनाची तारीख- 27 ऑगस्ट

5- क्रिमिनल जस्टीस S3 (Criminal Justice S3)- क्रिमिनल जस्टीसच्या तिसऱ्या सिझनमध्ये पंकज त्रिपाठी यांची मुख्य भूमिका आहे. न्यायव्यवस्था आणि त्याच्या मर्यादांवर आधारित या सीरिजची कथा आहे. यामध्ये श्वेता बासू प्रसाद, स्वस्तिका मुखर्जी आणि पूरब कोहली यांच्याही भूमिका आहेत. कुठे पाहू शकता?- डिस्ने प्लस हॉटस्टार प्रदर्शनाची तारीख- 26 ऑगस्ट

6- मी टाईम (Me Time)- आपल्या घरी राहून कुटुंबीयांसोबत वेळ व्यतित करण्याची आवड असणाऱ्या एका पित्याची कथा यात दाखवण्यात आली आहे. कुठे पाहू शकता?- नेटफ्लिक्स प्रदर्शनाची तारीख- 26 ऑगस्ट

Non Stop LIVE Update
मनसेत नाराज? राज ठाकरेंच्या शिलेदारानं उद्धव ठाकरेंची मशाल घेतली हाती
मनसेत नाराज? राज ठाकरेंच्या शिलेदारानं उद्धव ठाकरेंची मशाल घेतली हाती.
अजित पवार की युगेंद्र पवार? बारामती कोणाची? काका-पुतण्या भिडले
अजित पवार की युगेंद्र पवार? बारामती कोणाची? काका-पुतण्या भिडले.
राणांची यशोमती ठाकूरांवर टीका, 'माझी नणंदबाई मेलेल्या माणसाच्या...'
राणांची यशोमती ठाकूरांवर टीका, 'माझी नणंदबाई मेलेल्या माणसाच्या...'.
'इंजिन-मनसे घेऊन बसा', पक्ष-चिन्हाच्या टीकेवर दादांचं राज यांना उत्तर
'इंजिन-मनसे घेऊन बसा', पक्ष-चिन्हाच्या टीकेवर दादांचं राज यांना उत्तर.
सलमान नंतर बॉलिवूडच्या 'या' सुपरस्टारच्या जीवाला धोका, आला धमकीचा फोन
सलमान नंतर बॉलिवूडच्या 'या' सुपरस्टारच्या जीवाला धोका, आला धमकीचा फोन.
राऊतांना 'सिल्व्हर ओक'चा बुलडॉग म्हटल तर चालेल का?, भाजप नेत्याचा सवाल
राऊतांना 'सिल्व्हर ओक'चा बुलडॉग म्हटल तर चालेल का?, भाजप नेत्याचा सवाल.
शरद पवारांच्या निवृत्तीवर अजितदादांचं मिश्कील भाष्य, 'मला तर मागचा...'
शरद पवारांच्या निवृत्तीवर अजितदादांचं मिश्कील भाष्य, 'मला तर मागचा...'.
खोत फडणवीसांचा कुत्रा तर राऊत साप, दोघांच्या भांडणात भाजप नेत्याची उडी
खोत फडणवीसांचा कुत्रा तर राऊत साप, दोघांच्या भांडणात भाजप नेत्याची उडी.
'डुक्कराला कितीही साबण शॅम्पू लावला तरी ते..', खोतांचा राऊतांवर पटलवार
'डुक्कराला कितीही साबण शॅम्पू लावला तरी ते..', खोतांचा राऊतांवर पटलवार.
पवारांवरील त्या वक्तव्यानंतर खोत म्हणाले, 'ही गावगाड्याची भाषा पण...'
पवारांवरील त्या वक्तव्यानंतर खोत म्हणाले, 'ही गावगाड्याची भाषा पण...'.