Tejaswini Pandit: “बोल्ड रोल करून कसं वाटलं, असा प्रश्न जेव्हा मला विचारतात तेव्हा..”; तेजस्विनीने व्यक्त केली नाराजी
तेजस्विनीने यामध्ये देहविक्रेय महिलेची भूमिका साकारली. टीझर आणि ट्रेलरमधील बोल्ड सीन पाहिल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं. तेजस्विनीच्या आईनेही त्यावर परखड भूमिका व्यक्त केली होती. आता तेजस्विनीने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘रानबाजार’ (Raanbaazar) या वेब सीरिजची जोरदार चर्चा झाली. या सीरिजमधील अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) आणि प्राजक्ता माळी (Prajakta Mali) यांच्या बोल्ड लूकविषयी बरेच प्रश्न उपस्थित केले गेले. तेजस्विनीने यामध्ये देहविक्रेय महिलेची भूमिका साकारली. टीझर आणि ट्रेलरमधील बोल्ड सीन पाहिल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं. तेजस्विनीच्या आईनेही त्यावर परखड भूमिका व्यक्त केली होती. आता तेजस्विनीने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “बोल्ड रोल करून कसं वाटलं, असा प्रश्न जेव्हा मला लोक विचारतात, तेव्हा माझी फार चिडचिड होते. त्यावरून इतकी चर्चा का व्हावी तेच मला कळत नाही. हे 2022 आहे, अजूनही अशा गोष्टींकडे नकारात्मकतेने का पाहिलं जातं”, असा सवाल तिने केला.
मराठी इंडस्ट्रीतील अभिनेत्री जेव्हा अशा भूमिका स्वीकारते, तेव्हाच प्रेक्षक नाराज होत असल्याचं तेजस्विनी म्हणाली. “मराठी प्रेक्षकांची समस्या अशी आहे की जेव्हा एखादा मराठी अभिनेत्री अशा भूमिका करते तेव्हाच त्यांना काही गोष्टी बोल्ड वाटतात. जर त्यांनी इतर कलाकारांना पाहिलं तर ते त्यांच्यासाठी बोल्ड नसतं. दीपिका पादुकोण आणि इतर असे बरेच कलाकार आहेत, ज्यांनी इंटिमेट सीन केले आहेत. पण प्रेक्षकांना ते बोल्ड वाटणार नाही. अमराठी कलाकार जेव्हा अशा भूमिका करतो तेव्हा ते नाराजी व्यक्त करत नाहीत, पण एखाद्या मराठी अभिनेत्रीने तसं केल्यास ते लगेच नाराज होतात,” असं मत तेजस्विनीने व्यक्त केलं.
इन्स्टा पोस्ट-
View this post on Instagram
या विषयी बोलताना ती पुढे म्हणाली, “हे यामुळे होत असेल कारण प्रेक्षक आम्हाला खूप जवळचे समजतात. मराठी इंडस्ट्रीतील प्रत्येक कलाकार हा प्रेक्षकांच्या कुटुंबाचा एक भाग मानला जातो. ते आमच्याकडे ‘मेरे घर की लड़की है’ अशा दृष्टीने पाहतात. पण ते आमचं काम आहे हे त्यांना समजत नाही. हे अभिनय आहे आणि जसे त्यात विविध घटक आहेत, हे त्यापैकी एक आहे. जर तुम्ही त्याकडे आमच्या दृष्टीकोनातून नाही पाहाल तर तुम्हाला ते चुकीचंच वाटेल. पण आपण तिथे पोहोचू. मराठी प्रेक्षकांना तिथे यायला थोडा वेळ लागेल.”
रानबाजार या सीरिजमध्ये मोहन आगाशे (मुख्यमंत्री सतीश नाईक), मोहन जोशी (सयाजी पाटील), मकरंद अनासपुरे (पत्रकार दिवेकर ऊर्फ आप्पा), उर्मिला कोठारे (निशा), सचिन खेडेकर (युसूफ पटेल), वैभव मांगले (इन्स्पेक्टर पालांडे), अनंत जोग (रावसाहेब यादव), माधुरी पवार (प्रेरणा सयाजीराव पाटील) या सर्वांनीच आपापल्या भूमिका अगदी चोख साकारल्या आहेत. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी आणि रावण फ्युचर प्रॉडक्शनने रानबाजार’ची निर्मिती केली आहे.