Mi Punha Yein: सत्तेसाठी कोण कोणाच्या पाठीत खुपसणार खंजीर? ‘मी पुन्हा येईन’चे पुढील भाग प्रेक्षकांच्या भेटीला

रिसॅार्टवरूनही आमदारांना कसे फोडतात, अपक्ष आमदार विनायक दिवटेंच्या गटात कसे सामील होतात? कोण कोणाच्या पाठीत ‘खंजीर’ खुपसणार, कोणता गट सत्तेसाठी ‘पलटी’ मारणार, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत.

Mi Punha Yein: सत्तेसाठी कोण कोणाच्या पाठीत खुपसणार खंजीर? ‘मी पुन्हा येईन’चे पुढील भाग प्रेक्षकांच्या भेटीला
Mi Punha Yein: सत्तेसाठी कोण कोणाच्या पाठीत खुपसणार खंजीर? Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 04, 2022 | 3:55 PM

प्लॅनेट मराठी निर्मित, अरविंद जगताप दिग्दर्शित ‘मी पुन्हा येईन’ (Mi Punha Yein) वेब सीरिजचे तीन एपिसोड्स नुकतेच ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर (Planet Marathi) झळकले असून यात सत्तेसाठी सत्ताधाऱ्यांचे, विरोधकांचे एकमेकांवरील आरोप, आमदारांची पळवापळवी, रिसॅार्ट पॉलिटिक्स (Politics) पाहायला मिळत आहे. पहिल्या तीन एपिसोड्स पाहिल्यानंतर आता प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे ती पुढील एपिसोड्सची. त्यामुळे लवकरच आता पुढील भागही 5 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सत्तास्थापनेसाठी सत्ताधारी दिवटे आणि विरोधी पक्षनेते मुरकुटे कशाप्रकारे अपक्ष आमदारांची पळवापळवी करतात, हे येत्या एपिसोड्समध्ये पाहायला मिळणार आहे.

वसंतराव मुरकुटेंनी विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागताक्षणी आमदारांची पळवापळवी सुरू केली. रिसॅार्टवरूनही आमदारांना कसे फोडतात, अपक्ष आमदार विनायक दिवटेंच्या गटात कसे सामील होतात? कोण कोणाच्या पाठीत ‘खंजीर’ खुपसणार, कोणता गट सत्तेसाठी ‘पलटी’ मारणार, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत.

हे सुद्धा वाचा

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “या वेब सीरिजला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावरून सकारात्मक प्रतिक्रिया येत असून पुढील भागही लवकर प्रदर्शित करण्याची मागणी होत आहे. राजकारणामागील सत्य अतिशय व्यंगात्मक स्वरूपात यात दाखवण्यात आले आहे. ‘मी पुन्हा येईन’ ही वेब सीरिज प्रेक्षकांना विचार करायला लावणारी आहे. पहिल्या तीन भागांनी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवल्यानंतर आता पुढचे भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.” प्लॅनेट मराठी, गौतम कोळी व जेम क्रिएशन्सने ‘मी पुन्हा येईन’ची निर्मिती केली असून या वेबसीरिजमध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, सिद्धार्थ जाधव, रुचिता जाधव, भारत गणेशपुरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.