Vaibhav Tatwawadi: वैभव तत्त्ववादीची ‘निर्मल पाठक की घरवापसी’ सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
असं म्हणतात की, आपण आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडलो की आपोआप बदल सुरू होतो आणि हीच बाब 'निर्मल पाठक की घरवापसी' या सीरिजमध्ये अधोरेखित करण्यात आली आहे.
नरेन कुमार यांच्या ‘निर्मल पाठक की घरवापसी’ (Nirmal Pathak ki Ghar Wapsi) या वेब सीरिजमधून अभिनेता वैभव तत्ववादी (Vaibhav Tatwawadi) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजचं (Web Series) लेखन राहुल पांडे यांनी केलं असून दिग्दर्शन राहुल पांडे व सतिश नायर यांनी केलं आहे. कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित या सीरिजचे निर्माते नरेन कुमार व महेश कोराडे आहेत. यामध्ये वैभवसोबत अल्का आमिन, विनीत कुमार, पंकज झा, आकाश मखिजा, कुमार सौरभ, गरिमा श्रीवास्तव आणि इशिता गांगुली यांच्याही भूमिका आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वैभव या सीरिजमधील त्याच्या भूमिकेविषयी व्यक्त झाला.
असं म्हणतात की, आपण आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडलो की आपोआप बदल सुरू होतो आणि हीच बाब ‘निर्मल पाठक की घरवापसी’ या सीरिजमध्ये अधोरेखित करण्यात आली आहे. बिहारमधील छोट्या गावाच्या पार्श्वभूमीवर आधारित सोनी लिव्हवरील ही सीरिज एक स्पेशल ड्रामा आहे, जो हृदयस्पर्शी मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांना वास्तविकतेची जाणीव करून देतो. यामध्ये वैभव तत्ववादीने निर्मल पाठक या तरुणाची भूमिका साकारली आहे. जो 24 वर्षांनंतर त्याच्या मूळगावी परतला आहे आणि त्याची कथा त्याचे मूळ शोधण्याच्या प्रवासाच्या अवतीभोवती फिरते. वैभव तत्ववादीप्रमाणेच निर्मल पाठक लाजाळू व संकुचित वृत्तीचा आहे आणि याच बाबीमुळे त्याला सहजपणे भूमिकेमध्ये सामावून जाता आलं.
इन्स्टा पोस्ट-
View this post on Instagram
‘निर्मल पाठक की घरवापसी’च्या संकल्पनेबाबत सांगताना वैभव म्हणाला, ”ही सीरिज आपल्या समाजाबाबत बरंच काही सांगून जाते आणि मला या सीरिजचा भाग होण्याचा आनंद होत आहे. ही आपले मूळ शोधणा-या मुलाची कथा आहे. सीरिजच्या नावाशी संलग्न भूमिकेचे नाव असण्याची भावना नेहमीच खूप खास असते. मी खऱ्या आयुष्यातही निर्मल पाठकसारखाच आहे. पटकथा वाचल्यानंतर मला समजलं की, तो माझ्यासारखाच लाजाळू आहे. तो कमी बोलणारा आहे आणि याच गोष्टीशी मी सहजरित्या संलग्न होऊ शकतो.” ही सीरिज येत्या 27 मे पासून सोनी लिव्हवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.