पंकजा मुंडे, क्रांती रेडकर करणार ‘उंच माझा झोका पुरस्कार 2022’चं निवेदन

पंकजा मुंडे आणि क्रांती रेडकर या दोघींची जुगलबंदी या कार्यक्रमात आणखी रंगत आणेल यात शंकाच नाही. सोबतच कर्तृत्ववान स्त्रियांचा सन्मान आणि कलाकारांचे धमाकेदार नृत्याविष्कार प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

पंकजा मुंडे, क्रांती रेडकर करणार 'उंच माझा झोका पुरस्कार 2022'चं निवेदन
पंकजा मुंडे, क्रांती रेडकर करणार निवेदनImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Aug 23, 2022 | 9:19 AM

झी मराठी वाहिनीच्या मंचावर प्रेक्षकांना नेहमी प्रेरणा देणारे कार्यक्रम सादर होत असतात. या वर्षी देखील मला अभिमान आहे हे ब्रीद घेऊन स्त्री कर्तृत्वाचा सन्मान म्हणून ‘उंच माझा झोका’ (Uncha Mazha Zhoka) या नेत्रदीपक सोहळयाचे सादरीकरण होणार आहे . ‘उंच माझा झोका’ पुरस्काराचं यंदाचं हे आठवं वर्ष आहे. आपल्या कार्याने समाजाला सुदृढ वैचारिकरित्या समृद्ध करणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांचा यावेळी गौरव करण्यात येईल. या वर्षीच्या पुरस्काराचे खास आकर्षण म्हणजे या कार्यक्रमाच्या निवेदनाची धुरा पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि क्रांती रेडकर (Kranti Redkar) सांभाळणार आहेत.

पंकजा मुंडे आणि क्रांती रेडकर या दोघींची जुगलबंदी या कार्यक्रमात आणखी रंगत आणेल यात शंकाच नाही. सोबतच कर्तृत्ववान स्त्रियांचा सन्मान आणि कलाकारांचे धमाकेदार नृत्याविष्कार प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. ‘उंच माझा झोका’ पुरस्कार सोहळा झी मराठी वाहिनीवर 28 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या पहिल्यांदाच सूत्रसंचालनाची धुरा सांभाळताना पहायला मिळणार आहेत. तसंच अभिनेत्री क्रांती रेडकरसुद्धा बऱ्याच काळानंतर छोट्या पडद्यावर प्रेक्षकांसमोर येणार आहे. क्रांती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. विविध व्हिडीओ ती इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. तिच्या या व्हिडीओंना नेटकऱ्यांकडून दमदार प्रतिसाद मिळतो. याशिवाय क्रांती पडद्यामागची जबाबदारीसुद्धा हाताळत आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...