वादग्रस्त Kaali पोस्टरनंतर लीना मणिमेकलाई यांनी शेअर केला शिव-पार्वतीचा धुम्रपान करतानाचा फोटो; नेटकऱ्यांमध्ये संताप
लीना यांच्या 'काली' या डॉक्युमेंट्रीच्या पोस्टरवरून देशभरात वाद निर्माण झाला आहे. या पोस्टरमध्ये देवी कालीच्या (Kaali Poster Row) वेशातील अभिनेत्रीच्या हातात सिगारेट आणि LGBTचा झेंडा दाखवण्यात आला होता. बऱ्याच वादानंतर ट्विटरने त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून ही पोस्ट हटवली होती. त्यानंतर आता लीना यांनी आणखी एक वादग्रस्त फोटो शेअर केला आहे.
ट्विटरने ‘काली’ (Kaali) या डॉक्युमेंट्रीचा वादग्रस्त पोस्टर हटवल्याच्या काही तासांनंतर निर्मात्या लीना मणिमेकलाई (Leena Manimekalai) यांनी आणखी एक वादग्रस्त फोटो शेअर केला आहे. लीना यांनी शेअर केलेल्या या फोटोमध्ये भगवान शिव आणि पार्वतीच्या पोशाखातील एक पुरुष आणि एक स्त्री धूम्रपान करत असल्याचं दिसून येत आहे. ‘अन्यत्र..’ असं कॅप्शन देत त्यांनी हा फोटो पोस्ट केला आहे. लीना यांच्या ‘काली’ या डॉक्युमेंट्रीच्या पोस्टरवरून देशभरात वाद निर्माण झाला आहे. या पोस्टरमध्ये देवी कालीच्या (Kaali Poster Row) वेशातील अभिनेत्रीच्या हातात सिगारेट आणि LGBTचा झेंडा दाखवण्यात आला होता. बऱ्याच वादानंतर ट्विटरने त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून ही पोस्ट हटवली होती. त्यानंतर आता लीना यांनी आणखी एक वादग्रस्त फोटो शेअर केला आहे.
लीना यांच्यावर लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. त्यांच्याविरोधात विविध ठिकाणी तक्रारीसुद्धा दाखल करण्यात आल्या आहेत. हा वाद शमत नाही तोवर त्यांनी आणखी एक वादग्रस्त फोटो पोस्ट केला आहे. त्यांनी शेअर केलेल्या या नव्या फोटोवरून पुन्हा त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. ‘धर्माचा अपमान करणं बंद झालं पाहिजे’, असं एकाने लिहिलं. तर ‘लीना या जाणूनबुजून द्वेष पसरवण्याचं काम करत आहेत’, असं दुसऱ्याने म्हटलं. लीना यांच्या या पोस्टवर भाजपचे नेते शहजाद पूनावाला यांनी ट्विट करत लिहिलं, ‘हा रचनात्मक अभिव्यक्तीचा प्रश्न नाही, परंतु जाणूनबुजून लोकांमध्ये द्वेष पसरवण्याचा प्रयत्न आहे. हिंदूंना शिव्या देणं = धर्मनिरपेक्षकता? हिंदूंच्या आस्थेचा अपमान = उदारवाद? लीना यांना ठाऊक आहे की त्यांना काँग्रेस, टीएमसी यांच्याकडून समर्थन मिळत आहे.’
पहा ट्विट-
This is not about creative expression but deliberate provocations
Abusing Hindus = secularism? Insulting Hindu Astha = liberalism?
Leena is emboldened because she knows she has backing of an ecosystem which includes Left,Cong,TMC
So far TMC has not ACTED on Mahua Moitra pic.twitter.com/t4usGw1UTZ
— Shehzad Jai Hind (@Shehzad_Ind) July 7, 2022
कोण आहेत लीना मणिमेकलाई?
लीना मणिमेकलाई या मदुराईमधील सुदूर गावातील महाराजापुरम इथल्या राहणाऱ्या आहेत. त्यांचे वडील कॉलेजमध्ये लेक्चरर होते. लीना एका शेतकरी कुटुंबातील असून त्यांच्या गावातील प्रथेनुसार तिथल्या मुलीचं लग्न तिच्या मामाशी केलं जातं. लीनाला जेव्हा समजलं की त्यांचे कुटुंबीय त्यांच्या लग्नाची तयारी करत आहेत, तेव्हा त्या चैन्नईमधून पळून आल्या. त्यानंतर त्यांनी इंजिनीअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी आयटी सेक्टरमध्ये नोकरीसुद्धा केली. नोकरीनंतर त्यांनी चित्रपटविश्वात काम करण्याचा निर्णय घेतला.