Prajaktta Mali: प्राजक्ता माळी लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण? वाचा काय म्हणतेय ती..

मराठी चित्रपट आणि सीरिजनंतर प्राजक्ताने आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळविला आहे. बॉलिवूड (Bollywood) चित्रपटांसाठी ती सध्या ऑडिशन देत असून नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती याविषयी व्यक्त झाली.

Prajaktta Mali: प्राजक्ता माळी लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण? वाचा काय म्हणतेय ती..
Prajaktta MaliImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 10:01 AM

अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajaktta Mali) सध्या तिच्या ‘रानबाजार’ (RaanBaazar) या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजमध्ये प्राजक्ताने साकारलेल्या बोल्ड भूमिकेविषयी सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. काहींनी तिला ट्रोल केलं, तर काहींनी तिच्या अभिनयाचं कौतुक केलं. मराठी चित्रपट आणि सीरिजनंतर प्राजक्ताने आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळविला आहे. बॉलिवूड (Bollywood) चित्रपटांसाठी ती सध्या ऑडिशन देत असून नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती याविषयी व्यक्त झाली. “लोकांनी केवळ मला माझ्या सौंदर्यामुळे नाही तर अभिनयामुळे लक्षात ठेवावं अशी माझी इच्छा आहे”, असं प्राजक्ता यावेळी म्हणाली. बॉलिवूडच नाही तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम करण्याचीही इच्छाही तिने या मुलाखतीत बोलून दाखवली.

‘रानबाजार’मधील बोल्ड दृश्यांविषयी काय म्हणाली प्राजक्ता?

“माझ्या बोल्ड भूमिकेबाबत सोशल मीडियावर किंवा ऑनलाइन न्यूज पोर्टलवर जे काही बोललं जातं त्याने मला फारसा फरक पडत नाही. ओटीटी प्लॅटफॉर्मची ही स्ट्रॅटेजी होती आणि ती बरोबर कामी आली. माझ्या मते, इंटिमेट सीन्सपेक्षा या सीरिजचा कंटेट अधिक बोल्ड आहे”, असं ती म्हणाली.

“लोकांनी माझ्या अभिनयाविषयी अधिक बोलावं”

“माझ्या अभिनयापेक्षा माझ्या लूक्सविषयी अधिक बोललं जातं. मात्र रानबाजार या सीरिजमध्ये कदाचित हे चित्र बदलू शकेल. मी फक्त सुंदर नसून उत्तम अभिनेत्रीसुद्धा आहे, या दृष्टीने लोकांनी माझ्याकडे पहावं अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे भविष्यातही मला अशा आव्हानात्मक भूमिका मिळाव्यात. या सीरिजमुळे त्यांना माझी क्षमता कळाली असेल. पण तरीसुद्धा हे माझं बेस्ट काम नाही. माझं सर्वोत्कृष्ट काम मला अजून प्रेक्षकांसमोर आणायचं आहे”, अशा शब्दांत प्राजक्ता व्यक्त झाली.

हे सुद्धा वाचा

बॉलिवूडविषयी प्राजक्ता काय म्हणाली?

प्राजक्ता सध्या बॉलिवूड चित्रपटांसाठीही ऑडिशन्स देत आहे. याविषयी ती पुढे म्हणाली, “मला चांगल्या भूमिका हव्या आहेत. मी सहाय्यक भूमिका करू शकत नाही. लोकांनी माझ्यातील कलेला ओळखावं अशी माझी खूप इच्छा आहे. जेव्हा तुम्ही बॉलिवूड चित्रपटात काम करता, तेव्हा देशभरातील प्रेक्षकांना तुमची ओळख होते. त्यामुळे मी माझ्या कक्षा रुंदावण्याचा प्रयत्न करतेय. फक्त बॉलिवूडच नाही तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही मुख्य अभिनेत्री म्हणून मला काम करायचं आहे. हल्ली हिंदी सिनेमे आणि सीरिजमध्येही आपल्याला अधिकाधिक मराठी चेहरे पहायला मिळत आहेत.”

Non Stop LIVE Update
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.