खलनायक प्राण यांची लेक प्रचंड सुंदर, स्टायलिश; फोटो पाहून चाहते म्हणतायेत, ‘खरंच यांची मुलगी आहे?’
बॉलिवूड अभिनेते प्राण जितके भयानक खलनायक होते, तेवढीच प्रेमळ आणि निरागस त्यांची लेक; त्यांच्या मुलीचा व्हायरल होत असलेला एक फोटो वेधतोय अनेकांचं लक्ष
मुंबई : एक काळ असा होता जेव्हा महानायक अमिताभ बच्चन, अभिनेते धर्मेंद्र यांनी सिनेमांमध्ये अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारत चाहत्यांच्या मानवर अधिराज्य गाजवलं. एवढंच नाही आज देखील त्यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अशाच प्रसिद्ध अभिनेत्यांच्या यादीतील एक अभिनेते म्हणजे प्राण. प्राण यांनी खलनायकाची भूमिका साकारत चाहत्याच्या मनात खलनायक म्हणून राज्य केलं. आज प्राण आपल्यात नसले तरी त्यांच्या डोळ्यातील रागीट भाव आणि आवाज आजही चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्राण त्या काळातील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक होते. एकेकाळी फक्त आणि फक्त प्राण यांच्या चर्चा सर्वत्र रंगलेल्या असायच्या. प्राण यांनी १९४५ मध्ये शुक्ला सिकंद यांच्यासोबत लग्न केलं.
शुक्ला आणि प्राण यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. सध्या शुक्ला आणि प्राण यांची मुलगी पिंकी सिकंद तुफान चर्चेत आली आहे. पिंकी सिकंद प्रचंड सुंदर आणि ग्लॅमरस दिसते. पिंकीच्या सौंदर्यापुढे बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री देखील फिक्या आहेत. दिसायला सुंदर असूनही पिंकी सिकंद हिने स्वतःला बॉलिवूडपासून दूर ठेवलं.
पिंकी हिने प्रसिद्ध उद्योगपती विवेक भल्ला यांच्यासोबत लग्न केलं. विवेक भल्ला यांच्यासोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्री आता आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहे. सध्या पिंकी हिचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये पिंकी वडिलांच्या फोटोसोबत दिसत आहे. लाल ड्रेसमध्ये पिंकी प्रचंड सुंदर दिसत आहे.
प्राण यांची मुलगी पिंकी सिकंद यांना दोन भाऊ आहेत. त्यांच्या दोन भावांचं नाव सुनील सिकंद आणि अरविन्द सिकंद असं आहे. १२ जुलै २०१३ साली प्राण यांचं निधन झालं. प्राण यांनी जंजीर, डॉन, कालिया आणि बॉबी यांसारख्या हीट सिनेमांमध्ये काम केलं आहे.