Sophie Turner: प्रियांका चोप्राची वहिनी प्रसूतीनंतर लगेच तिसऱ्यांदा गरोदर? फोटो पाहून चाहते पेचात!

सोफी आणि तिचा पती जो जोनास यांच्या आयुष्यात जुलै महिन्यात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं होतं. आता पुन्हा सोफीने बेबी बंपचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमुळे नेटकरी पेचात पडले आहेत.

Sophie Turner: प्रियांका चोप्राची वहिनी प्रसूतीनंतर लगेच तिसऱ्यांदा गरोदर? फोटो पाहून चाहते पेचात!
Priyanka Chopra and Sophie TurnerImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 04, 2022 | 5:58 PM

बॉलिवूडची देसी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्राची (Priyanka Chopra) वहिनी सोफी टर्नर (Sophie Turner) ही पुन्हा एकदा तिच्या प्रेग्नंसीमुळे (Pregnancy) चर्चेत आली आहे. सोफी आणि तिचा पती जो जोनास यांच्या आयुष्यात जुलै महिन्यात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं होतं. आता पुन्हा सोफीने बेबी बंपचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमुळे नेटकरी पेचात पडले आहेत. सोफी तिसऱ्यांदा प्रेग्नंट आहे का असा प्रश्न यूजर्स विचारत आहेत. सोफी टर्नरने तिचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे. या फोटोमध्ये सोफीने काळ्या रंगाचा क्रॉप टॉप, लेगिंगसह राखाडी आणि नारिंगी रंगाचं जॅकेट घातलं आहे. यात तिचा बेबी बंप सहज पहायला मिळतोय.

सोफीने हा फोटो शेअर करत लिहिलं, ‘फुल्ल ऑफ बेबी’. अनेक युजर्सनी कमेंट करून तिला विचारलं आहे की ती पुन्हा गरोदर आहे का? काहींनी तिला पुन्हा एकदा शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. तर दुसऱ्याने लिहिलं, ‘मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे सोफी.’ त्याचवेळी आणखी एका युजरने विचारलं, ‘हा फोटो नवीन आहे की जुना?’ तर सोफी पुन्हा एकदा गरोदर नसून हा सोफी टर्नरच्या दुसऱ्या गर्भधारणेदरम्यानचा फोटो आहे.

हे सुद्धा वाचा

सोफी टर्नर आणि जो जोनास यांनी जुलै 2022 मध्ये त्यांच्या दुसऱ्या बाळाचं स्वागत केलं. त्याआधी या दोघांना दोन वर्षांची मुलगी व्हिला आहे. व्हिलाचा जन्म जून 2020 मध्ये झाला होता. मे महिन्यात Elle UK मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सोफी म्हणाली, “आमच्या कुटुंबात आणखी एक सदस्य येत असल्याने आम्हाला खूप आनंद होत आहे. हा आमच्यासाठी सर्वोत्तम काळ आहे. आपल्या मुलांना लहानाचं मोठं होताना पाहणं ही जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे.” सोफी टर्नरचा पती जो जोनास हा प्रियांका चोप्राचा पती निक जोनासचा भाऊ आहे आणि हे तीन भावंडं जोनास ब्रदर्स म्हणून खूप प्रसिद्ध आहेत.

2016 मध्ये नेदरलँडमधील एका कॉन्सर्टमध्ये सोफी आणि जो जोनासच्या रोमान्सची पहिल्यांदा चर्चा रंगली होती. नंतर या दोघांनी 1 मे 2019 रोजी लास वेगासमध्ये दोघांनी लग्न करणार असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर 29 जून 2019 रोजी फ्रान्समध्ये हे दोघं विवाहबंधनात अडकले.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.