RaanBaazaar: राजकीय खेळ बघायला मजा येणार; ‘रानबाजार’च्या ट्रेलरवर प्रतिक्रियांचा पाऊस

अभिजित पानसे दिग्दर्शित पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेल्या या वेब सीरिजमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत चेहरे पहायला मिळतात. ट्रेलरमध्ये (RaanBaazaar) त्या भूमिकांची झलक दाखवण्यात आली आहे. प्राजक्ताने तिच्या करिअरमधील सर्वांत आव्हानात्मक भूमिका स्वीकारली आहे.

RaanBaazaar: राजकीय खेळ बघायला मजा येणार; 'रानबाजार'च्या ट्रेलरवर प्रतिक्रियांचा पाऊस
RaanBaazaarImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 5:12 PM

अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) आणि प्राजक्ता माळी (Prajakta Mali) यांनी सोशल मीडियावर ‘रानबाजार’ (RaanBaazaar) या आगामी वेब सीरिजचा टीझर शेअर केल्यापासून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली. या टीझरमध्ये दोघींच्या बोल्ड अंदाजाने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर आता या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरवरही प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागला आहे. अभिजित पानसे दिग्दर्शित पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेल्या या वेब सीरिजमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत चेहरे पहायला मिळतात. ट्रेलरमध्ये त्या भूमिकांची झलक दाखवण्यात आली आहे. प्राजक्ताने तिच्या करिअरमधील सर्वांत आव्हानात्मक भूमिका स्वीकारली आहे. जवळपास दोन मिनिटांच्या या ट्रेलरने सीरिजच्या कथेविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित ही सीरिज असल्याचं म्हटलं जातंय.

या ट्रेलरवर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ‘टीझरप्रमाणेच ट्रेलरसुद्धा जबरदस्त आहे. मकरंद अनासपुरेंचा लूक जबरदस्त दिसतोय, आशा आहे की त्यांच्या कलाकारीचा एक उत्तम भाग पाहायला मिळेल,’ असं एकाने म्हटलंय. तर ‘राजकीय खेळ बघायला मजा येणार’ असं दुसऱ्या युजरने लिहिलं. उत्कृष्ट ट्रेलर आणि कलाकार एकदम तगडे नक्कीच सीरिज भारी असणार, असंही नेटकऱ्याने म्हटलंय.

पहा ट्रेलर-

हे सुद्धा वाचा

‘प्रत्येक कलाकाराला आपल्या कारकिर्दीत विविधांगी भूमिकांमध्ये झळकण्याची, समाजात अस्तित्वात असणारी विविध पात्रं साकारण्याची, सतत काहीतरी नवं करण्याची इच्छा असते. मी त्याला अपवाद नाही. लहानपणापासून स्मिता पाटील, रंजना यांना बघत मोठी झाले, (मी त्यांच्याइतकी मोठी नक्कीच नाही.) पण त्यांच्या कारकिर्दीतून प्रेरीत होऊन आणि तुम्हा मायबाप रसिक प्रेक्षकांवर विश्वास ठेवून केलेला हा प्रयत्न. माझ्यातल्या अभिनेत्रीवर विश्वास ठेवून माझ्या पदरी ही भूमिका टाकल्याबद्दल अभिजीत पानसे व मराठीतील सगळ्यात मोठी वेब सीरिज बनवल्याबद्दल प्लॅनेट मराठी आणि अक्षय बर्दापूरकर यांचे आभार. आतापर्यंत माझ्यावर व माझ्या कामांवर जसं प्रेम केलत, जो पाठींबा दिलात; तसाच या ही वेब सीरिजला द्याल अशी आशा व्यक्त करते,’ अशी पोस्ट प्राजक्ताने लिहिली.

‘रानबाजार’ येत्या 20 मे पासून ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेजस्विनी आणि प्राजक्तासोबतच उर्मिला कोठारे, माधुरी पवार, सचिन खेडेकर, मोहन आगाशे, मकरंद अनासपुरे आणि अभिजीत पानसे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Non Stop LIVE Update
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.