Rana Naidu teaser: काका-पुतण्याची जोडी करणार धमाल; साऊथ सुपरस्टार्सची टक्कर

'राणा नायडू'चा जबरदस्त टीझर पाहिलात का? राणा डग्गुबत्ती घेणार व्यंकटेशशी पंगा

Rana Naidu teaser: काका-पुतण्याची जोडी करणार धमाल; साऊथ सुपरस्टार्सची टक्कर
Venkatesh Daggubati and Rana Daggubati Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 24, 2022 | 7:02 PM

मुंबई-  साऊथ सिनेसृष्टीतील दोन मोठे सुपरस्टार पहिल्यांदाच पडद्यावर एकमेकांसमोर येणार आहेत. ‘बाहुबली’ फेम राणा डग्गुबत्ती (Rana Daggubati) आणि त्याचा काका व्यंकटेश डग्गुबत्ती (Venkatesh Daggubati) हे लवकरच एका वेब सीरिजमध्ये स्क्रीन शेअर करणार आहेत. ‘राणा नायडू’ (Rana Naidu) असं या सीरिजचं नाव आहे. त्याचा उत्कंठावर्धक टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हे दोन्ही साऊथ सुपरस्टार्स पहिल्यांदाच एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये एकत्र काम करत आहेत. ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

या सीरिजची कथा मुंबईच्या पार्श्वभूमीवर असून यामध्ये राणा आणि व्यंकटेश हे पिता-पुत्राची भूमिका साकारत आहे. ‘रे डॉनोवन’ या अमेरिकी वेब सीरिजचा हा रिमेक आहे. राणा नायडूच्या टीझरमध्ये जबरदस्त ॲक्शनचा भरणा पहायला मिळतो.

राणा आणि व्यंकटेश यांच्याशिवाय सीरिजमध्ये सुरवीन चावलाचीही मुख्य भूमिका आहे. या धमाकेदार टीझरची सुरुवात राणाच्या संवादाने होते. “कोणाला मदतीची गजर आहे का”, असा प्रश्न तो विचारतो. तेव्हा दुसरा व्यक्ती त्याला उत्तर देतो, “मी तुमच्या मदतीबद्दल खूप ऐकून आहे. जेव्हा कधी एखादा सेलिब्रिटी संकटात असतो, तेव्हा सर्वांत आधी तुम्ही मदतीला धावता.”

हे सुद्धा वाचा

पहा टीझर-

सीरिजमधील काका-पुतण्याची जोडी पाहून चाहते फारच उत्सुक झाले आहेत. ‘या सीरिजची उत्सुकतेने वाट पाहतोय’, असं एकाने म्हटलंय. तर ‘ही जोडी कमाल करणार’, असा विश्वास काहींनी व्यक्त केला.

या सीरिजबद्दल बोलताना राणा म्हणाला, “यात अशा अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या मी पहिल्यांदाच करतोय. माझे काका व्यंकटेश यांच्यासोबत मी पहिल्यांदा काम करतोय. आमच्या करिअरमध्ये आम्ही दोघांनी यापूर्वी केलेल्या गोष्टींपेक्षा हे पूर्णपणे वेगळं आहे.”

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.