Brahmastra: दक्षिणेत फिकी पडली रणबीर-आलियाची जादू; पहा ‘ब्रह्मास्त्र’च्या कमाईचा आकडा

'सीता रामम'मधील मृणाल ठाकूर-दलकर सलमान आणि 'कार्तिकेय 2'मधील निखिल सिद्धार्थ-अनुपमा परमेश्वरन यांच्यासमोर रणबीर-आलियाची जोडी फिकी पडली आहे.

Brahmastra: दक्षिणेत फिकी पडली रणबीर-आलियाची जादू; पहा 'ब्रह्मास्त्र'च्या कमाईचा आकडा
Brahmastra: दक्षिणेत फिकी पडली रणबीर-आलियाची जादूImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 13, 2022 | 4:05 PM

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या करिअरमधील सर्वांत मोठा चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) हा 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. हिंदीसोबतच हा चित्रपट तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या दाक्षिणात्य भाषांमध्ये प्रदर्शित झाला. हिंदीत ब्रह्मास्त्रची दणक्यात कमाई होत असली तरी दाक्षिणात्य भाषांमध्ये हा चित्रपट अजूनही मागेच आहे. सीता रामम (Sita Ramam) आणि कार्तिकेय 2 (Karthikeya 2) या चित्रपटांपुढे रणबीर-आलियाचा ब्रह्मास्त्र अपयशी ठरला आहे.

अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्रने जगभरात तब्बल 240.2 कोटी रुपयांची कमाई केली. तर भारतात या चित्रपटाने 140.99 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. पण इतकी कमाई करूनही ‘सीता रामम’मधील मृणाल ठाकूर-दलकर सलमान आणि ‘कार्तिकेय 2’मधील निखिल सिद्धार्थ-अनुपमा परमेश्वरन यांच्यासमोर रणबीर-आलियाची जोडी फिकी पडली आहे.

2022 मध्ये या वर्षभरात प्रदर्शित झालेल्या पॅन इंडिया चित्रपटांचं सोमवारचं बॉक्स ऑफिस कलेक्शन तपासण्यात आलं. या तपासात असं समोर आलं आहे की रणबीर कपूरच्या ब्रह्मास्त्रने सोमवारी म्हणजेच चौथ्या दिवशी विजय देवरकोंडाच्या ‘लायगर’, विक्रमच्या ‘कोब्रा’ आणि आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’पेक्षा जास्त कमाई केली आहे. मात्र मृणाल ठाकूरच्या ‘सीता रामम’ आणि निखिलच्या ‘कार्तिकेय 2’ सारख्या छोट्या बजेटच्या चित्रपटांना मागे टाकण्यात ब्रह्मास्त्र अपयशी ठरला आहे.

हे सुद्धा वाचा

ब्रह्मास्त्रच्या तेलुगू व्हर्जनने सोमवारी फक्त 1.05 कोटींचा व्यवसाय केला. तर मृणाल ठाकूरच्या सीता रामम आणि निखिलच्या कार्तिकेय 2 (तेलुगूमध्ये) यांनी सोमवारी अनुक्रमे 2.4 कोटी आणि 6.19 कोटी रुपयांची कमाई केली होती. लायगर, कोब्रा आणि लाल सिंग चड्ढा यांच्याबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटांनी तेलुगू भाषेत अनुक्रमे 0.27 कोटी, 0.2 कोटी आणि 0 कोटींचा व्यवसाय केला आहे.

या वर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या तेलुगू व्हर्जनने पहिल्या सोमवारी किती कोटींची कमाई केली यावर एक नजर टाकुयात..

RRR- 29.5 कोटी रुपये KGF 2- 6.9 कोटी रुपये कार्तिकेय 2- 6.19 कोटी रुपये सीता रामम- 2.4 कोटी रुपये विक्रम- 1.08 कोटी रुपये ब्रह्मास्त्र- 1.05 कोटी रुपये लायगर- 0.27 कोटी रुपये कोब्रा- 0.2 कोटी रुपये शमशेरा- 0.02 कोटी रुपये लाल सिंग चड्ढा- 0

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.