Ranbir Kapoor: रणबीरला पाहण्यासाठी तुंबड गर्दी; चाहत्यांमध्ये झाली धक्काबुक्की

धक्काबुक्कीत पडलेल्या चाहत्यांची रणबीरने केली मदत; नेटकऱ्यांकडून होतोय कौतुक

Ranbir Kapoor: रणबीरला पाहण्यासाठी तुंबड गर्दी; चाहत्यांमध्ये झाली धक्काबुक्की
Ranbir KapoorImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 23, 2022 | 6:01 PM

आज (शुक्रवार) देशभरात राष्ट्रीय सिनेमा दिन साजरा केला जात आहे. या दिनानिमित्त ब्रह्मास्त्र (Brahmastra) या चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जी (Ayan Mukerji) आणि मुख्य अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हे चाहत्यांना भेटण्यासाठी थिएटरमध्ये पोहोचले. यावेळी रणबीरला पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली. या गर्दीत अनेक चाहते जमिनीवर पडले. हे पाहून रणबीर लगेचच त्यांच्या मदतीसाठी पोहोचला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली. रणबीरचा हा व्हिडीओ पाहून चाहते त्याचं कौतुक करू लागले.

राष्ट्रीय सिनेमा दिनानिमित्त रणबीर कपूर आणि अयान मुखर्जी हे मुंबईतील एका थिएटरमध्ये पोहोचले होते. या दोघांना पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यादरम्यान लोकांचा जमाव अनियंत्रित झाला आणि काहींनी बॅरिकेड्सवरून उड्या मारल्या. अशात धक्काबुक्कीमुळे दोन-तीन जण जमिनीवर पडले. त्यांना पाहताच रणबीर कपूर लगेच मागे वळला आणि चाहत्यांना उठवायला मदत करू लागला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रीय सिनेमा दिनानिमित्त ब्रह्मास्त्रच्या निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटाच्या तिकिटाची किंमत 75 रुपये केली आहे. 23 सप्टेंबर 2022 रोजी सर्व चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा करण्यात येतोय. यावेळी ‘ब्रह्मास्त्र: पार्ट 1 शिवा’ची तिकिटं अनेक ठिकाणी अवघ्या 75 रुपयांना विकली गेली.

ब्रह्मास्त्रमध्ये रणबीर कपूरसोबत त्याची पत्नी आलिया भट्टही मुख्य भूमिकेत आहे. यासोबतच अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय यांच्याही भूमिका आहेत. विशेष बाब म्हणजे या चित्रपटात दीपिका पदुकोण, डिंपल कपाडिया आणि शाहरुख खान यांनी पाहुण्या कलाकारांची भूमिका साकारली.

ब्रह्मास्त्र हा चित्रपट 9 सप्टेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या 14 दिवसांत चित्रपटाने हिंदीमध्ये 156 कोटी रुपये, तमिळमध्ये 3.68 कोटी रुपये, कन्नडमध्ये 30 लाख रुपये, मल्याळममध्ये 10 लाख रुपये आणि तेलुगूमध्ये 13 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.