Sai Pallavi: काश्मिरी पंडित आणि गाईंच्या तस्करीबद्दल साई पल्लवीचं विधान; नेटकरी संतापले
तिने व्यक्त केलेल्या या मतावरून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी साईचं मत योग्य असल्याचं म्हटलं आहे तर काहींनी तिच्यावर जोरदार टीका केली आहे.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) ही तिच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते. साई सध्या तिच्या आगामी ‘विराट पर्वम’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त तिने नुकतीच एक मुलाखत दिली असून ही मुलाखत सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. या मुलाखतीत साईने ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटात दाखवलेला काश्मिरी पंडितांचा नरसंहार (Kashmir genocide) आणि गाईंची कत्तल केल्याने मुस्लीम चालकाची केलेली हत्या (lynching for cow smuggling) या दोन्ही गोष्टी चुकीच्या असल्याचं म्हटलं आहे. तिने व्यक्त केलेल्या या मतावरून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी साईचं मत योग्य असल्याचं म्हटलं आहे तर काहींनी तिच्यावर जोरदार टीका केली आहे.
काय म्हणाली साई पल्लवी?
“मी तटस्थ भूमिका घेण्याला प्राधान्य देते. कारण मला लहानपणापासूनच हे शिकवलं गेलंय की तू चांगली व्यक्ती होण्याचा प्रयत्न कर. ज्यांच्यासोबत अन्याय होतोय, त्यांची मदत कर. कोणी लहान, कोणी मोठा असं काही नसतं. अशाच वातावरणात मी लहानाची मोठी झाले. डावे आणि उजवे यांच्याविषयी मी फार ऐकलंय, पण यात कोण बरोबर आणि कोण चुकीचं हे सांगता येणार नाही. द काश्मीर फाईल्स या चित्रपटात काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय आणि नरसंहार दाखवण्यात आला. धार्मिक वादाबद्दल बोलायचं झाल्यास, गाईंची तस्करी करून घेऊन जाणाऱ्या मुस्लीम चालकाला मारण्यात आलं आणि त्यावेळी जय श्री रामच्या घोषणा दिल्या गेल्या. मग तेव्हा जे घडलं आणि आता जे घडतंय त्यात काय फरक आहे? आपण चांगली व्यक्ती म्हणून वागलो तर इतरांना आपण दुखावणार नाही. जर तुम्ही व्यक्ती म्हणून चांगले नसाल तर डावे असो किंवा उजवे न्याय कुठेच नसेल. पण व्यक्ती म्हणून तुम्ही चांगले असाल तर तुम्ही कुठेही असलात तरी तटस्थ म्हणून वागाल आणि विचार कराल”, असं ती म्हणाली.
पहा तिच्या मुलाखतीचा व्हिडीओ-
“For me violence is wrong form of communication. Mine is a neutral family where they only taught to be a good human being. The oppress, however, should be protected. I don’t know who’s right & who’s wrong. If you are a good human being, you don’t feel one is right.” – #SaiPallavi pic.twitter.com/o6eOuKvd2G
— Hate Detector ? (@HateDetectors) June 14, 2022
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया-
Best part in #SaiPallavi ‘s statement that she agreed that they were ‘Cow Smugglers’
Will tomorrow India will accept if someone starts smuggling your pets like dogs & cats from your houses?
Why steal someone’s cow? It should be dealt with strict punishments.
Chors!
— AParajit Bharat ??? (@AparBharat) June 14, 2022
I liked #SaiPallavi. Not any more.
I never complained about her pimple filled cheeks, ugly shaped ass, bad hair styles.
But going forward I will hate her. As she tells killing a cow smuggler and killing Kashmiri Pundits are same.
She might say killing Terrorist and KP is same.
— Norbert Elekes (@N0rbertElekes) June 14, 2022
काहींनी साईच्या मताचं समर्थन केलंय तर काहींनी नरसंहार आणि गाईंच्या तस्करीबद्दल केलेली हत्या या दोन गोष्टी एकच नसल्याचं म्हटलंय. गाईंची तस्करी करणं हा मुळात गुन्हा असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलंय. ट्विटरवर तिच्या या मुलाखतीवरून विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
साई पल्लवीचा ‘विराट पर्वम’ हा चित्रपट येत्या 17 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये तिच्यासोबत राणा डग्गुबत्ती मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय ती ‘गार्गी’ या चित्रपटातही झळकणार आहे. गौतम रामचंद्रन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.