Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘इथे मीच गुरू, मीच शिष्य..’; ‘चाबुक’ चित्रपटात समीर धर्माधिकारी अनोख्या भूमिकेत

मधुर भांडारकर (Madhur Bhandarkar) यांचे बंधू कल्पेश भांडारकर यांनी 'चाबुक' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. येत्या २५ फेब्रुवारीला ‘चाबुक’ चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

'इथे मीच गुरू, मीच शिष्य..'; 'चाबुक' चित्रपटात समीर धर्माधिकारी अनोख्या भूमिकेत
Chabuk Movie
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 3:14 PM

जीवन म्हणजे नात्या-गोत्यांची घट्ट वीण. वेगवेगळ्या नात्यांच्या प्रेमळ बंधांनी आपण ती विणत असतो. मध्येच विसंवादाची गाठ बसली, तर नात्यांचे बंध ताणले जातात आणि धागा तुटतो. कधी कधी भान राखून वेळीच नात्यांचा तोल सावरलाही जातो; पण खरा गोंधळ उडतो मनं सांभाळताना. यावर आत्मपरीक्षण हाच उपाय असून ज्याचा त्यानेच शोधायचा हे सांगू पाहणारा ‘चाबुक’ (Chabuk) हा चित्रपट २५ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. श्रीष्टी मोशन पिक्चर कंपनी’च्या बॅनरखाली ‘चाबुक’ या मराठी चित्रपटाच्या निर्मिती व दिग्दर्शनाची धुरा कल्पेश भांडारकर (Kalpesh Bhandarkar) यांनी सांभाळली आहे. कल्पेश भांडारकर हे हिंदी सिनेसृष्टीतील एक नावाजलेलं नाव. अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटांचे छायाचित्रण आणि दिग्दर्शन करत कल्पेश भांडारकर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. भाऊ मधुर भांडारकर यांच्यासह कल्पेश यांनी हिंदीतल्या अनेक दिग्गजांसोबत चित्रपट केले आहे. यानंतर ते आता स्वत:ची पहिली मराठी चित्रकृती घेऊन येत आहेत. चाबुक चित्रपटात अभिनेता समीर धर्माधिकारी (Sameer Dharmadhikari) व अभिनेत्री स्मिता शेवाळे मध्यवर्ती भूमिकेत दिसणार असून त्यांच्यासोबत सुधीर गाडगीळ आणि मिलिंद शिंदे यांच्यासुद्धा भूमिका आहेत.

चित्रपटाची अनोखी कथा

आजच्या युगात भौतिकतेने आपण समृध्द होत असू मात्र, माणसांचा माणसाशी संवाद कमी होत चालला आहे. त्यावर वेळीच अनुभव आणि निरीक्षणाच्या मदतीने आत्मपरीक्षणाचा चाबुक ओढण्याची गरज असल्याचे दाखवून देणारा चाबुक चित्रपट एका कुटुंबाची कथा आपल्यासमोर मांडतो. ‘काहीतरी’ मिळवण्याच्या ध्यासापायी आपल्या हातातून बऱ्याच गोष्टी निसटत चालल्या आहेत याची जाणीव चित्रपटाच्या नायकाला नसते. ती जाणीव दोन फॅण्टसी फॅक्टर व्यक्तिरेखांच्या माध्यमातून फार भन्नाट पद्धतीने या चित्रपटात करुन देण्यात आली आहे.

मध्यमवर्गीय मानसिकतेवर आधारलेले बरेच चित्रपट बनतात. पण आपण काहीतरी वेगळं करूया, जे मनाला लागेल, हृदयाला भिडेल हा प्रमुख विचार चित्रपट निर्मितीमागे होता. एखादी गोष्ट मनाला लागली तर बदल नक्की होतो, हे सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला असल्याचे दिग्दर्शक कल्पेश भांडारकर सांगतात. चाबुक चित्रपटाची कथा अभय इनामदार आणि निरंजन पटवर्धन यांची आहे. गीते मंदार चोळकर आणि मिलिंद शिंदे यांनी लिहिली असून संगीत विपीन पटवा यांचे आहे. चित्रपटातील सुमधुर गीतांना बेला शेंडे, ब्रिजेश शांडिल्य, विपिन पटवा यांचा स्वरसाज लाभला आहे. येत्या २५ फेब्रुवारीला ‘चाबुक’ चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.