Shehnaaz Gill: शहनाज गिल बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज; सलमान खानच्या चित्रपटात साकारणार भूमिका

शहनाज गिल (Shehnaaz Gill) अनेक वर्षांपासून पंजाबी इंडस्ट्रीत काम करतेय पण तिला खरी ओळख बिग बॉस 13 मुळे मिळाली. पंजाबी गाणी गाणारी आणि म्युझिक अल्बममध्ये झळकणारी शहनाज ही 'बिग बॉस'मुळे (Bigg Boss) घराघरात पोहोचली.

Shehnaaz Gill: शहनाज गिल बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज; सलमान खानच्या चित्रपटात साकारणार भूमिका
Shehnaaz Gill and Salman KhanImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Apr 29, 2022 | 3:52 PM

अभिनेत्री आणि गायिका शहनाज गिलने (Shehnaaz Gill) अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नसलं तरी तिची लोकप्रियता एखाद्या मोठ्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. पंजाबी गाणी गाणारी आणि म्युझिक अल्बममध्ये झळकणारी शहनाज ही ‘बिग बॉस’मुळे (Bigg Boss) घराघरात पोहोचली. बिग बॉसच्या घरात शहनाजची दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाशी मैत्री झाली. या दोघांनी बिग बॉसचं तेरावं सिझन गाजवलं होतं. सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाज पूर्णपणे खचली होती. मात्र आता हळूहळू ती त्यातून सावरू लागली आहे. शहनाजचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग असून तिच्या चाहत्यांसाठी आता एक खूशखबर आहे. शहनाज लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याचं कळतंय.

शहनाज गिल ही सलमानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं समजतंय. सलमान आणि शहनाजसोबत यामध्ये अभिनेता आयुष शर्मा आणि पूजा हेगडेसुद्धा भूमिका साकारणार आहेत. सोशल मीडियावर सध्या याचीच चर्चा असून शहनाज किंवा सलमानकडून अद्याप याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. अलीकडेच शहनाज ही बाबा सिद्दिकीच्या इफ्तार पार्टीत दिसली होती. या पार्टीदरम्यान तिचा शाहरुख खानला भेटतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या इफ्तार पार्टीला सलमान खानसुद्धा हजर होता. नंतर शहनाजने सलमानचीही भेट घेतली.

इन्स्टा पोस्ट-

शहनाज गिल अनेक वर्षांपासून पंजाबी इंडस्ट्रीत काम करतेय पण तिला खरी ओळख बिग बॉस 13 मुळे मिळाली. शहनाज आणि सिद्धार्थची मैत्री इतकी गाजली की चाहत्यांना या दोघांना ‘सिदनाज’ असं नाव दिलं होतं. 2 सप्टेंबर 2021 रोजी सिद्धार्थचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.