Jhund: नागराज मंजुळेंचा ‘झुंड’ पुन्हा संकटात; उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी, ओटीटीच्या प्रदर्शनावर संकट?

झुंडचं (Jhund) ओटीटी प्रदर्शन थांबवावं यासाठी तेलंगणा हायकोर्टाने दिलेल्या आदेशाला आव्हान देण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली होती. 6 मे रोजी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. त्यापूर्वी ही सुनावणी तातडीने पूर्ण व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Jhund: नागराज मंजुळेंचा 'झुंड' पुन्हा संकटात; उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी, ओटीटीच्या प्रदर्शनावर संकट?
अमिताभ बच्चन, नागराज मंजुळे-झुंडImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 04, 2022 | 1:10 PM

नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित ‘झुंड’ (Jhund) या चित्रपटाच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील प्रदर्शनाला (Jhund OTT Release) स्थगिती देण्यास आव्हान देणाऱ्या याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. झुंडचं ओटीटी प्रदर्शन थांबवावं यासाठी तेलंगणा हायकोर्टाने दिलेल्या आदेशाला आव्हान देण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली होती. वरिष्ठ वकील सी. आर्यमा सुंदरम यांनी याचिकेवर तातडीच्या सुनावणीची मागणी सरन्यायाधीशांसमोर केली. “हा चित्रपट 6 मे रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. थिएटरमध्ये तो आधीच प्रदर्शित झाला. शुक्रवारी हायकोर्टाने एका ओळीचा आदेश पारित केला. त्यांना ओटीटी प्रदर्शनाबाबत तडजोड करायची आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत त्यांचं आव्हान आधीच फेटाळलं गेलंय”, असं निवेदन सुंदरम यांनी दिलं. यावर सरन्यायाधीशांनी उद्या सुनावणी करण्यास परवानगी दिली.

हैदराबादस्थित चित्रपट निर्माते नंदी चिन्नी कुमार यांनी ‘झुंड’च्या निर्मात्यांविरुद्ध कॉपीराइट उल्लंघनाचा आरोप करणारी याचिका दाखल केली होती. 29 एप्रिल रोजी न्यायमूर्ती पी. श्री. सुधा यांच्या खंडपीठाने या याचिकेवर अंतरिम आदेश दिला होता. “या प्रकरणाच्या पुढील सुनावणीपर्यंत म्हणजे 8 जून, 2022 पर्यंत दोन्ही पक्षांकडून स्थगिती कायम ठेवू”, असं हायकोर्टाने आदेशात म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

ट्विट-

नंदी कुमार यांनी याआधी झुंडच्या निर्मात्यांविरुद्धच्या एका प्रकरणात सामंजस्याच्या अटींचं उल्लंघन केल्याचा आरोप करत चित्रपटाच्या थिएटर रिलीजच्या विरोधातही आदेश मागितला होता. मात्र ट्रायल कोर्टाने त्यांची विनंती नाकारली आणि चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यास परवानगी दिली. त्यानंतर हा चित्रपट 4 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. दरम्यान, नंदी चिन्नी कुमार यांनी ट्रायल कोर्टाच्या आदेशाला आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेतली आणि 29 एप्रिल रोजी अंतरिम आदेश पारित करण्यात आला. आता 6 मे रोजी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. त्यापूर्वी ही सुनावणी तातडीने पूर्ण व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.