Dipti Dhyani: अभिनेत्रीने पतीसाठी केलं मुंडण; ‘हे खरं प्रेम’ म्हणत नेटकऱ्यांनी केलं कौतुक

अभिनेता सूरज थापरसाठी (Sooraj Thapar) त्याची पत्नी दिप्ती ध्यानीने (Dipti Dhyani) जे केलं, सध्या त्याचीच चर्चा सोशल मीडियावर होत आहे. दिप्तीचं हे उदाहरण पाहून खरं प्रेम आणि जीवनासाथी या शब्दांची प्रचिती येते.

Dipti Dhyani: अभिनेत्रीने पतीसाठी केलं मुंडण; 'हे खरं प्रेम' म्हणत नेटकऱ्यांनी केलं कौतुक
Dipti DhyaniImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 5:19 PM

लग्न म्हणजे आयुष्यभरासाठी एकमेकांना दिलेलं वचन. आपल्या जोडीदारासाठी काहीही करायला तयार असणारे लोक खूप कमी पहायला मिळतात. अभिनेता सूरज थापरसाठी (Sooraj Thapar) त्याची पत्नी दिप्ती ध्यानीने (Dipti Dhyani) जे केलं, सध्या त्याचीच चर्चा सोशल मीडियावर होत आहे. दिप्तीचं हे उदाहरण पाहून खरं प्रेम आणि जीवनासाथी या शब्दांची प्रचिती येते. प्रत्येक महिलेसाठी आपले केस खूप मौल्यवान असतात. केसांच्या (Hair) चांगल्या वाढीसाठी महिला अनेक उपाय करत असतात. मात्र दिप्तीने आपल्या पतीसाठी चक्क मुंडण केलं आहे.

सूरज थापर यांना जेव्हा कोरोनाची लागण झाली होती, तेव्हा त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत होतं. सूरज लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी दिप्तीने प्रार्थना केली होती. सूरज यांची प्रकृती सुधारण्यासाठी त्यांनी तिरुपती बालाजीकडे जणू नवसच केला होता. त्यानुसार पतीची तब्येत ठीक झाल्यानंतर दिप्ती यांनी तिरुपती बालाजीला जाऊन मुंडण केलं. याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले. ‘तुझ्या नावे सूरज थापर’, असं कॅप्शन देत दिप्तीने हे फोटो पोस्ट केले आहेत.

हे सुद्धा वाचा

पहा फोटो-

View this post on Instagram

A post shared by Dipti Thapar (@diptisthapar)

सूरज थापरनेही इंस्टाग्रामवर दिप्तीचे काही फोटो शेअर केले आहेत. यासोबतच त्यांनी ट्रान्सफॉर्मेशनचा व्हिडिओही शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिलं, ‘हे प्रेम आहे, या जगात तुमच्यासाठी असं कोणी करत नाही, हे खरं प्रेम आहे.’ दिप्तीचे हे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनीही कमेंट करत कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘तुम्ही खूप महान आहात मॅडम’, असं एकाने लिहिलं. तर हे खरं प्रेम आहे, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. दिप्ती स्वतः देखील एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. चंद्रगुप्त मौर्य, माता की चौकी, कैरी रिश्ता खट्टा मीठा यांसारख्या टीव्ही शोमध्ये तिने काम केलं आहे.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.