Ankita Lokhande: अंकिता लोखंडे-विकी जैनने पटकावला ‘स्मार्ट जोडी’चा किताब; जाणून घ्या बक्षिसाची रक्कम

विजेतेपद पटकावल्यानंतर त्यांना 25 लाख रोख बक्षीस आणि गोल्डन गठबंधन ट्रॉफी मिळाली आहे. या यशानंतर अंकिता लोखंडेने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने या सुंदर क्षणाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Ankita Lokhande: अंकिता लोखंडे-विकी जैनने पटकावला 'स्मार्ट जोडी'चा किताब; जाणून घ्या बक्षिसाची रक्कम
Ankita Lokhande and Vicky JainImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 11:02 AM

अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचा विकी जैन (Vicky Jain) यांनी ‘स्मार्ट जोडी’चा (Smart Jodi) किताब पटकावला आहे. लग्नानंतर काही दिवसांनीच या दोघांनी रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला. विजेतेपद पटकावल्यानंतर त्यांना 25 लाख रोख बक्षीस आणि गोल्डन गठबंधन ट्रॉफी मिळाली आहे. या यशानंतर अंकिता लोखंडेने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने या सुंदर क्षणाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अंकिता आणि विकी यांनी बलराज-दिप्ती तुली यांना टक्कर देत ट्रॉफी जिंकली. बलराज आणि दिप्ती उपविजेते ठरले, तर अंकिता आणि विकी यांनी विजेतेपद पटकावलं. अंकिताने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा मिळून अंकिता-विकीला बक्षीस देताना दिसत आहेत.

विकी हा व्यावसायिक असून त्याचा अभिनयक्षेत्राशी फारसा संबंध नाही. असं असलं तरी त्याने या शोमध्ये आपली खूप चांगली साथ दिल्याचं अंकिताने म्हटलं. “विकीने शोमध्ये खूप चांगली साथ दिली. त्याने माझ्यासारखीच स्पर्धात्मक भावना या शोमध्ये दाखवली आणि माझ्यापेक्षाही चांगलं परफॉर्म केलं. तो कॅमेरासमोर कम्फर्टेबल नाही असं मला वाटायचं. आम्ही एकमेकांना खूप चांगल्याप्रकारे समजून घेऊ शकतो, हे यातून सिद्ध झालं आहे”, अशी प्रतिक्रिया अंकिताने जिंकल्यानंतर ‘ई टाइम्स’शी बोलताना दिली. त्याचप्रमाणे या शोमध्ये आम्हाला दोघांना खूप वेळ एकत्र घालवायला मिळाला, असंही तिने सांगितलं.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

विकी आणि अंकिता हे लग्नानंतर वेगळे राहत आहेत. कारण विकीचा व्यवसाय बिलासपूरमध्ये आहे. अंकिता इथे मुंबईत राहते आणि तो कामानिमित्त बिलासपूरला राहतो. मुंबईत या दोघांनी घर विकत घेतलं असून त्याच्या इंटेरिअरचं काम अजूनही सुरू आहे. त्यामुळे विकी जेव्हा कधी मुंबईला अंकिताला भेटायला येतो, तेव्हा तो तिच्याच घरी राहतो. “विकीमुळे माझ्या आयुष्यात समतोल निर्माण झालाय. त्याने माझ्यासाठी खूप काही केलं असून मला त्याचे आभार मानायचे आहेत”, असं अंकिता म्हणाली. अंकिता आणि विकीने डिसेंबर 2021 मध्ये लग्न केलं. मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये या दोघांचा विवाहसोहळा पार पडला.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.